शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडी महापालिकेमध्ये स्ट्रक्चरल ऑडिटरच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 23:50 IST

धोकादायक इमारती : अनुभव नसलेल्या अधिकाऱ्यांकडून पाहणी

नितीन पंडित  भिवंडी : भिवंडी महापालिका हद्दीत धामणकर नाका परिसरात जिलानी इमारत कोसळल्याची घटना घडल्यानंतर शहरातील धोकादायक व अतिधोकादायक इमारतींचा मुद्दा चव्हाट्यावर आला. वारंवार घडणाऱ्या या दुर्घटनांमुळे शहरातील धोकादायक व अतिधोकादायक इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करावे, असे सरकारी आदेश असतानाही महापालिकेत स्ट्रक्चरल ऑडिटर यांची नेमणूकच झालेली नसल्याची बाब समोर आली आहे. आयुक्तांनी जे आर्किटेक्ट नेमले आहेत त्यांना अनुभव नसल्याचा आरोप नगरसेवकांनी केला आहे.

भिवंडी महापालिका क्षेत्रात धोकादायक व अतिधोकादायक अशा एकूण ८९१ इमारती आहेत, तर ३० वर्षांवरील इमारतींची संख्या हजारोंच्या घरात आहे. परंतु या सर्व इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यासाठी सरकारने प्रायोगिक तत्त्वावर पाच नोंदणीकृत बांधकाम अभियंता (स्ट्रक्चरल इंजिनिअर)यांची नेमणूक करा, असे निर्देश सरकार, न्यायालयाने दिल्यानंतरही महापालिका प्रशासनाने तज्ज्ञांची नियुक्ती केलेली नाही. परिणामी शहरातील अनेक इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करताना अडचणी येत आहेत. भविष्यात जर जिलानी इमारतीसारखी दुर्घटना घडल्यास त्यास जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित होत आहे.          

मनपा आयुक्त डॉ. पंकज आशिया यांनी शहरातील २७ आर्किटेक्ट यांना स्ट्रक्चरल ऑडिटचे आदेश दिले आहेत. त्यांच्यासोबत नगररचना विभागातील अधिकारी व प्रभाग अधिकाऱ्यांनी तपासणी करून वर्गवारी करून प्रमाणपत्र देण्याचे नमूद केले आहे. त्यासाठी बीट निरीक्षक, बीट मुकादम परिसरातील इमारतींची पाहणी करून नोंदवहीत नोंद केल्यावर त्यावर शहानिशा करण्यासाठी अधिकारी नियुक्त करायचा आहे. सध्या प्रशासनाने नेमलेले २७ आर्किटेक्ट अशा इमारतींच्या सर्वेक्षणाबाबत माहिती नसल्याने त्यांच्या नियुक्तींवर अनेक नगरसेवकांसह नागरिकांनीही सवाल उपस्थित केला आहे. धोकादायक व अतिधोकादायक इमारतींची वर्गवारी करून इमारतींचे पुर्ननिरीक्षण नोंदणीकृत बांधकाम अभियंता यांनी तपासणी अहवाल देणे बंधनकारक आहे. धोकादायक व मोडकळीस आलेल्या इमारती धोकादायक जाहीर करण्याची जबाबदारी प्रभाग समिती सहायक आयुक्त यांची असल्याचे आदेशात स्पष्ट केले आहे. 

पाच कनिष्ठ अभियंत्यांच्या नेमणुकीची मागणीसामाजिक कार्यकर्ते जाहिद मुख्तार शेख यांनी बेकायदा बांधकामासंदर्भात उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेच्या अंतिम निकालात अधिकारी व सहायक आयुक्त यांच्याकडून शहरातील ३० वर्षे जुन्या इमारतींची वर्गवारी करून घेणे चुकीचे असल्याचे म्हटले आहे. त्यानुसार तातडीने त्यांच्याकडील हे काम काढून घेऊन सरकारी आदेशानुसार पाच कनिष्ठ अभियंता याकामी नियुक्त करावेत अशी मागणीही शेख यांनी केली आहे. यासंदर्भात आयुक्त डॉ. पंकज आशिया यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो ऊ शकला नाही तर महापालिकेत सध्या स्ट्रक्चरल ऑडिटराची नेमणूक केलेली नाही, अशी माहिती जनसंपर्क अधिकारी मिलिंद पळसुले यांनी दिली आहे.

टॅग्स :thaneठाणेbhiwandiभिवंडी