शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडी मनपातील कंत्राटी कामगार वेतनापासून वंचित, आंदोलनाचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2019 16:27 IST

भिवंडी महानगर पालिकेत पाणीपुरवठा विभागात काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांना जून आणि जुलै या दोन महिन्याचा पगार मिळालेला नाही.

रोहिदास पाटील

अनगाव - भिवंडी महानगर पालिकेत पाणीपुरवठा विभागात काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांना जून आणि जुलै या दोन महिन्याचा पगार मिळालेला नाही. कामगारांना तत्काळ पगार न दिल्यास आंदोलन करणार असल्याचा इशारा श्रमजीवी कामगार संघटनेच्या वतीने भिवंडी मनपा आयुक्त अशोक रणखांब यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे दिला आहे. 

गेल्या पंधरा वर्षांपासून मनपाच्या पाणीपुरवठा विभागात बोरवेल पाइपलाईन निगा दूरूस्ती व वॉलमनच काम करणाऱ्या कामगारांना किमान वेतनानूसार वेतन मिळावे म्हणून आंदोलने केल्यानंतर जूलै महिन्यात किमान वेतन मंजूर करण्यात आलं. कामगारांना किमान वेतनानूसार वेतनासह इतर सूविधा मिळाव्यात याकरिता 21 जूनला तत्कालीन आयुक्त मनोहर हिरे यांच्यासोबत श्रमजीवी संघटनेच्या शिष्ठमंडळासोबत बैठक झाली. त्यावेळी कामगारांना किमान वेतन ओळखपत्रासह इतर सोयीसूविधा देण्याच्या सूचना आयूक्त मनोहर हिरे यांनी पाणीपूरवठा विभागाचे अधिकाऱ्यांना दिल्या. त्यानंतर ही सुविधा न मिळाल्याने पुन्हा मनपा आयुक्तांना लेखी निवेदन दिल्यानंतर आयूक्त अशोक रणखांब यांच्या सोबत ऑगस्टला पालिका सभागृहात शिष्टमंडळासोबत बैठक घेण्यात आली.

जुलै महिन्यांचा पगार व वॉलमनमध्ये काम करणाऱ्या कामगारांना कमी नकरता कामगारांना किमान वेतनानूसार त्यांचे वेतन आरटीजीस करून इतर सुविधा देण्याच्या सूचना पालिका आयुक्त अशोक रणखांब यांनी पाणीपुरवठा कार्यकारी अभियंता गायकवाड शाखा अभियंता संदिप पटनावर यांना दिले. मात्र आयुक्तांनी दिलेल्या आदेशाची पूर्तता संबंधीत अधिकाऱ्यांनी आजपर्यंत केलेली नाही. वॉलमनच काम करणाऱ्या काही कंत्राटी कामगारांना जूनचा पगार मिळालेला नाहीच. त्यांना व पाइपलाईन दूरूस्तीच काम करणाऱ्या कामगारांनाही जुलै महिन्याचा पगार मिळालेला नाही यासंबधी अधिकाऱ्यांच्या भेटी घेतल्या. मात्र त्यानंतरही कामगारांचा जुलै महिन्याचा पगार मिळाला नसल्याने कामगारांना किमान वेतनानूसार वेतन मिळावे व संघटनेच्या कोणत्याही सभासद कामगाराला कमी न करता नवीन ठेक्यामध्ये प्राधान्याने समाविष्ट करून घ्यावे तसे न केल्यास गणपती उत्सवापूर्वीच तीव्र आंदोलन करण्याचा इशारा संघटनेचे उपाध्यक्ष दत्तात्रेय कोलेकर, ठाणे जिल्हा अध्यक्ष अशोक सापटे, श्रमजीवी कामगार संघटनेचे भिवंडी तालुका अध्यक्ष अ‍ॅड रोहिदास पाटील यांनी लेखी निवेदनाद्वारे दिला आहे. गणेशोत्सव जवळ आला आहे. कामगारांकडे गणपतीची स्थापना करण्यात येते. मात्र पगारच मिळालेला नाही. ठेकेदार अधिकारी पगार देण्यास टाळाटाळ करत असल्याने कामगार आर्थिक अडचणीत सापडले आहेत.  

 

टॅग्स :bhiwandiभिवंडीthaneठाणे