शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

भिवंडी ग्रामीणमध्ये भाजपाची दारोमदार शिवसेनेवरच अवलंबून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2019 23:58 IST

अनगाव भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदारसंघावर शिवसेनेचे वर्चस्व आहे. भिवंडी आणि वाडा पंचायत समिती, तसेच भिवंडी कृषी उत्पन्न बाजार समितीसह बहुतांश ग्रामपंचायतीही शिवसेनेच्या ताब्यात आहे.

- रोहिदास पाटीलअनगाव भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदारसंघावर शिवसेनेचे वर्चस्व आहे. भिवंडी आणि वाडा पंचायत समिती, तसेच भिवंडी कृषी उत्पन्न बाजार समितीसह बहुतांश ग्रामपंचायतीही शिवसेनेच्या ताब्यात आहे; मात्र भिवंडी लोकसभा मतदारसंघ भाजपा लढवत असून, मतदारसंघातील लहानमोठ्या निवडणुकांमुळे भाजपा आणि सेनेत कमालीचे वितुष्ट निर्माण झाले आहे. त्यामुळे उद्भवलेली शिवसैनिकांची नाराजी दूर करून, निवडणुकीची खिंड लढवण्याचे कसब भाजपाला दाखवावे लागणार आहे.पूर्वीच्या वाडा विधानसभा मतदारसंघाचे विभाजन होऊन भिवंडी ग्रामीण हा वेगळा मतदारसंघ अस्तित्वात आला. वाडा मतदारसंघ हा शिवसेना-भाजपा युतीचा बालेकिल्ला आहे. येथे पाच वेळा भाजपाचे आदिवासी विकासमंत्री विष्णू सवरा आमदार म्हणून विजयी झाले आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला हा मतदारसंघ राखण्यात आजतागायत यश आलेले नाही. २०१४ च्या निवडणुकीत सेना-भाजपाची युती नसताना शिवसेनेचे शांताराम मोरे निवडून आले. भाजपाचा हक्काचा मतदारसंघ सेनेने खेचून घेतल्याने युतीच्या खासदारांचा भ्रमनिरास झाला. या निवडणुकीपासूनच भाजपा-शिवसेना पदाधिकाऱ्यांमध्ये कुरघोडीचे राजकारण सुरू झाले.भिवंडी ग्रामीण मतदारसंघात वाडा शहरासह तालुक्यातील डाकिवली, कुडूस, चिंचघर, दिनकरपाडा, कोढला आणि भिवंडीतील काल्हेर, कशेळी, खारबाव, पाये, पडघा, कासने, मैदे, सागाव, देवचोले, गणेशपुरी, ऊसगाव आदी गावपाड्यांचा समावेश आहे. येथे मोठ्या प्रमाणात आदिवासी, बौद्ध, आगरी आणि कुणबी समाजांची मते असून त्याखालोखाल मुस्लिम बाराबलुतेदारांसह कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या उत्तर भारतीय कामगारांची मते आहेत. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसकडून डहाणू मतदारसंघाचे माजी खासदार दामोदर शिंगडा यांचे सुपुत्र सचिन शिंगडा, राष्ट्रवादीकडून जिल्हा परिषद सदस्य महादेव आंबो घाटाल, भाजपाकडून शांताराम दुदाराम पाटील, भाजपाचे उमेदवार शांताराम पाटील यांचे लहान बंधू दशरथ दुदाराम पाटील हे मनसेकडून, तर शिवसेनेकडून शांताराम मोरे रणांगणात होते. या निवडणुकीत भिवंडी ग्रामीणमधील मतदारांनी शिवसेनेचे शांताराम मोरे यांना ५७ हजार ८२ एवढ्या मताधिक्याने निवडून दिले.राष्ट्रवादीचे घाटाल यांना २३ हजार ४१४, काँग्रेसचे शिंगडा यांना १० हजार ९२३, भाजपाचे पाटील यांना ४७ हजार ९२२, मनसेचे दशरथ पाटील यांना २५ हजार ५८०, बहुजन विकास आघाडीचे राजेश दुमाडा यांना एक हजार ३१८, तर शिवसेनेचे शांताराम मोरे यांना ५७ हजार ८२ मते मिळाली होती. या निवडणुकीत जवळपास १० हजार मतांच्या फरकाने भाजपाचे शांताराम पाटील दुसºया क्रमांकावर होते. हा पराभव भाजपाचे खासदार कपिल पाटील यांच्या जिव्हारी लागला. तेव्हापासून विधानसभा निवडणुकीत हा मतदारसंघ आपल्याकडे खेचण्यासाठी भाजपाचे चार वर्षांपासून प्रयत्न सुरू होते.लोकसभा निवडणुकीत भिवंडी ग्रामीण मतदारसंघात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार विश्वनाथ पाटील यांना ४२ हजार ५७३, मनसेचे सुरेश ऊर्फ बाळ्यामामा म्हात्रे यांना २७ हजार ३३०, तर शिवसेना-भाजपा युतीचे कपिल मोरेश्वर पाटील यांना ८५ हजार ५४२ मते मिळाली. या मतदारसंघात युतीने ४३ हजार मतांची आघाडी घेतली आहे. ती आघाडी या निवडणुकीतही राखण्यासाठी युतीच्या पदाधिकाऱ्यांची कसोटी लागणार आहे. या मतदारसंघात २०१४ च्या निवडणुकीत दोन लाख ६२ हजार २७५ मतदार होते. यंदाच्या निवडणुकीत दोन लाख ७८ हजार २३८ मतदार आहेत. निवडणूक आयोगाकडून नवीन मतदारांची नोंदणी सुरू आहे. मतदारसंघात ३५४ मतदान केंद्रे आहेत.मतदारसंघात बेकायदा बांधकामे वाढली असून, लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. मतदारसंघात ग्रामीण भाग असून, अनेक आदिवासी-कातकरीवाड्या, पाड्यांमध्ये नागरी सुविधांची वानवा आहे. आरोग्य, पाणी, रस्त्यांचा बोजवारा उडाला आहे. गावपाड्यांत मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई जाणवते. पाणीपुरवठा योजना नियोजनाअभावी राबवल्याने ठेकेदारांनी अधिकाºयांच्या संगनमताने सावळागोंधळ केला आहे. त्यामुळे नळपाणीपुरवठा योजनांचे पाणी सामान्यांपर्यंत पोहोचलेच नाही. जोपर्यंत संबंधितांना लोकप्रतिनिधी जाब विचारत नाहीत, तोपर्यंत पाण्याचा प्रश्न सुटणार नाही. मनोरंजन केंद्र आणि मैदानांची कमतरता असून, वैद्यकीय सुविधांचाही अभाव आहे. आमदार शांताराम मोरे आणि खा. कपिल पाटील यांच्या निधीतून विकासकामे सुरू आहेत; मात्र आमदारांनी मंजूर केलेल्या रस्त्याच्या कामांचे भूमिपूजन करून भाजपा खासदार व त्यांचे पदाधिकारी या कामाचे श्रेय लाटत असल्याचा शिवसेनेचा आरोप आहे. त्यामुळे दोघांच्या श्रेयवादाचा फटका विकासकामांना बसत असून, शिवसेना-भाजपा पदाधिकाºयांमध्ये मतभेद निर्माण झाले आहेत. हे मतभेद दूर करताना भाजपाची कसोटी लागणार आहे.राजकीय घडामोडी- भिवंडी ग्रामीण मतदारसंघात शिवसेनेची पकड असली, तरी लोकसभा निवडणुकीचे गणित पाहता, शिवसेनेची या पक्षाला कितपत प्रामाणिकपणे साथ मिळते, यावर भाजपाचे बरेच काही अवलंबून राहणार आहे.- या मतदारसंघातील वाडा पंचायत समितीवर भाजपाचे वर्चस्व आहे. कार्यकर्त्यांची फळी आहे. आदिवासी विकासमंत्री विष्णू सवरा याच मतदारसंघाचे आहेत. काँग्रेसची अस्तित्वासाठी लढाई असून, राष्ट्रवादी काँग्रेस सावध भूमिका घेत आहे.- भिवंडी ग्रामीण मतदारसंघासह भिवंडी लोकसभा मतदारसंघात श्रमजीवी संघटनेची मोठी ताकद आहे. त्यामुळे श्रमजीवी संघटना लोकसभा निवडणुकीत कोणत्या पक्षाला पाठिंबा देणार, याकडे सर्वच पक्षांचे लक्ष वेधले आहे.- काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही बेबनाव आहे. त्यांचे मनोमिलन करून निवडणुकीत त्यांचा फायदा करून घेण्याचे कसब आघाडीच्या उमेदवारास दाखवावे लागणार आहे.- विद्यमान खासदार कपिल पाटील यांनी या मतदारसंघाकडे फारसे लक्ष दिले नाही. सेनेचे पदाधिकारी तथा कार्यकर्त्यांना डावलल्याने शिवसैनिक नाराज आहेत. त्यामुळे त्यांची मनधरणी करण्याचे काम त्यांना करावे लागणार आहे.युती तर झाली, मनोमिलनाचे काय?दुसरीकडे, ग्रामीण मतदारसंघात नव्याने निर्माण झालेल्या वाडा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवारांनी केलेला भाजपाचा पराभव, हा भाजपाच्या जिव्हारी लागला आहे. त्यामुळे युती झाली असली, तरी कार्यकर्त्यांचे मनोमिलन कितपत झाले असेल, हा प्रश्नच आहे.मतदारसंघात पाच वर्षांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विविध निवडणुकांमध्ये शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस यांची आघाडी नसली तरी, त्यांनी घेतलेली भूमिका एकमेकांना पूरक होती. भाजपाला रोखण्याचा या आघाडीने सातत्याने प्रयत्न केला.भिवंडी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत सेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे, श्रमजीवी संघटना यांच्या महाआघाडीने बाजी मारली.भिवंडी पंचायत समिती सभापतीपदाच्या निवडणुकीत सेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे एकत्र असताना भाजपाने सेनेला कोंडीत पकडून निवडणुकीत पराभव केला.ठाणे जिल्हा मजूर फेडरेशनच्या संचालकांच्या निवडणुकीत शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील यांचे भाऊ पंडित पाटील यांचा पराभव करण्यासाठी भाजपाने केलेले प्रयत्न आणि एक महिन्यापूर्वी फेडरेशनच्या अध्यक्षाच्या निवडणुकीत पंडित पाटील यांना भाजपाने विरोध केल्याने पत्करावा लागलेला पराभव, यासारख्या अनेक घटनांनी शिवसैनिक भाजपावर नाराज आहेत. लोकसभा निवडणुकीत त्यांची नाराजी दूर करणे, हा भाजपासाठी सर्वाधिक महत्त्वाचा विषय आहे.ठाणे जिल्हा परिषद निवडणुकीत सेना-भाजपा स्वतंत्रपणे लढले. या निवडणुकीत सेनेने बाजी मारली; मात्र या निवडणुकीत गड आला आणि सिंह गेला, अशी स्थिती शिवसेनेची झाली.दाभाड जिल्हा परिषद गटात शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील यांचा भाजपाचे दयानंद पाटील यांनी अवघ्या ३३ मतांनी पराभव केला. तो पराभव शिवसेनेच्या प्रकाश पाटील यांच्यासह अन्य शिवसैनिकांच्या जिव्हारी लागला आहे.दृष्टिक्षेपात राजकारणभिवंडी ग्रामीण मतदारसंघातील वाडा हा वसई, भिवंडी यांना जोडणारा केंद्रबिंदू आहे. अंबाडी येथून नाशिक, ठाणे, वाडा, जव्हारकडे जाणारे महामार्ग आहेत. या ठिकाणी शासनाच्या वतीने ग्रामीण रु ग्णालय मंजूर झाले आहे. त्याकरिता जागाही देण्यात आली आहे; मात्र गेल्या अनेक वर्षांपासून हे रु ग्णालय कागदावरच आहे. सध्या ते अंबाडी येथील छोट्याशा जागेत सुरू आहे.हे रुग्णालय या भागातील नागरिकांसाठी जीवनदायी ठरू शकते; मात्र त्यासाठी प्रयत्न अपुरे पडत आहेत. रुग्णालयाची इमारत व्हावी, याकरिता येथील श्रमजीवी संघटनेसह इतर संस्था अग्रेसर आहेत. त्यांनी आंदोलन, मोर्चे काढून जागाही मंजूर करून घेतली आहे. या जागेवर ठाणे जिल्हा परिषदेच्या विद्यमान सदस्यांनीच अतिक्र मण केले आहे. त्यामुळे दुसºया जागेचा शोध सुरू आहे; मात्र आरोग्याच्या प्रश्नावर लोकप्रतिनिधी केव्हा आवाज उठवणार ? या निवडणुकीत नागरिक त्यांना जाब विचारण्याच्या मन:स्थितीत दिसत आहेत.

टॅग्स :Electionनिवडणूक