भिवंडी : शहरातील भोईवाडा पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्याप्रकरणी आरोपीस समजपत्र देण्यास गेलेल्या पोलिसाला शिवीगाळ करून मारहाण केली. याप्रकरणी आरोपीस अटक केली आहे. शहरातील धामणकरनाका-माधवनगर येथील ताज जनरल स्टोअर्सजवळ राहणाऱ्या अब्दुल रशीद अब्दुल मोमीन (२५) याच्याविरोधात त्याच्याच बहिणीने भोईवाडा पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल केला. अब्दुल रशीदला समज देण्यासाठी भोईवाडा पोलीस ठाण्याचे बीट मार्शल पोलीस शिपाई सिद्धीकी (३९) हे त्याच्या दुकानावर गेले होते. तेव्हा त्यांना मारहाण झाली. (प्रतिनिधी)
भिवंडीमध्ये आरोपीची पोलिसाला मारहाण
By admin | Updated: February 13, 2017 05:03 IST