शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०२९ पर्यंत मीच महाराष्ट्राचा CM, हेच कार्यक्षेत्र, दिल्ली अजून दूर”: देवेंद्र फडणवीस
2
मुंबईत महायुती, इतरत्र स्वतंत्र; मुख्यमंत्र्यांचे स्पष्ट संकेत, विरोधकांवर जोरदार हल्लाबोल
3
आजचे राशीभविष्य : गुरुवार 23 ऑक्टोबर २०२५; आत्मविश्वास वाढेल, जीवनसाथी किंवा प्रिय व्यक्तीचा सहवास आनंददायी असेल
4
निवडणूक आयोगाकडून आता देशभर SIRची तयारी; दिल्लीत दोन दिवसीय परिषद, अधिकाऱ्यांकडून आढावा
5
तेलावरून तापले राजकारण; ट्रम्प पुन्हा म्हणाले, भारत रशियन तेलाची खरेदी कमी करणार
6
मुंबईत महायुती एकत्र, काँग्रेसला सेना- मनसे नकोच; आयोगाच्या आदेशाआधीच नगरपालिकांसाठी तयारी
7
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर प्रतिबंध लादण्याचा प्रयत्न निंदनीय”: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
8
सरकारने केली शेतकरी, बेरोजगारांची फसवणूक: चेन्नीथला, काँग्रेसची राज्यव्यापी आंदोलनाची घोषणा
9
रेल्वे अपघातात पती गमावला, तिने लढा दिला; २३ वर्षांनंतर ‘सुप्रीम’ निर्णयाने न्याय मिळाला
10
सुवर्णाची झळाळी, शिर्डी साईमंदिरात उत्साहात दिवाळी; २.५० कोटींच्या रत्नजडित दागिन्यांची आरास
11
चांदीत ८ दिवसांत २६ हजारांची घसरण; सोन्याच्या दरालाही मोठा फटका, १ दिवसात ११ हजारांनी उतरले
12
सत्या नाडेला यांना वार्षिक पगार ₹८४६ कोटी मिळणार; एआयमुळे दिली मायक्रोसॉफ्टला ओळख
13
AUS W vs ENG W : 'चारचौघी' स्वस्तात आटोपल्या; मग ऑस्ट्रेलियाच्या या दोघी इंग्लंडला पुरुन उरल्या!
14
बोगस नोंदणी विरोधात सत्ताधारी आमदाराची कोर्टात धाव; एकाच पत्त्यावर हजारो मतदार, काय आहे प्रकार?
15
पुतिन यांची 'खतरनाक हसीना' जागी झाली, जगातील गुप्तचर यंत्रणा सतर्क, काय आहे नवीन मिशन?
16
क्रॉस बॉर्डरवर भारताचा दबदबा वाढणार; ६ महिन्यात भारतीय सैन्यात सज्ज होणार '२० भैरव बटालियन'
17
उद्धव ठाकरे पुन्हा राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ' निवासस्थानी; अचानक भेटीमागचं 'राज'कारण काय?
18
भाजपाची नाराजी नको, एकनाथ शिंदे करणार कारवाई; रवींद्र धंगेकरांची शिंदेसेनेतून हकालपट्टी होणार?
19
१६०० वर्षांपासून हजारो लाकडाच्या खांबांवर उभं आहे युरोपमधील हे सुंदर शहर, असं आहे त्यामागचं गुपित
20
अमेरिका, ब्रिटनमध्ये पडझड, उद्या भारतात परिणाम दिसणार? सोने-चांदीचे दर मोठ्या प्रमाणात कोसळणार  

भार्इंदर पालिकेला फटकारले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2018 06:45 IST

भार्इंदर पश्चिमेकडील आरक्षण क्र. ९६ वरील सहा हजार चौरस मीटर जागा खेळाच्या मैदानासाठी राखीव ठेवण्याचा ठराव ११ डिसेंबर २००६ च्या महासभेत मंजूर करण्यात आला.

भार्इंदर : पश्चिमेकडील मॅक्सेस मॉलसमोरील शहीद भगतसिंग मैदानाच्या आरक्षणावर मॉलच्या विकासकाने केलेले बांधकाम बेकायदा असल्याचा निर्वाळा पिंपरी-चिंचवड महापालिकेचे तत्कालीन आयुक्त श्रीकर परदेशी यांच्या एकसदस्यीय चौकशी समितीने दिल्यानंतर तत्कालीन आयुक्त डॉ. नरेश गीते यांनी मैदानाचा भाडेकरार रद्द केल्याचा आदेश १३ जानेवारी २०१७ रोजी काढला. परंतु, त्याची अंमलबजावणीच न झाल्याने उच्च न्यायालयाने राज्य सरकार व पालिकेला चांगलेच धारेवर धरत ८ जूनपूर्वी प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश नुकत्याच झालेल्या सुनावणीच्यावेळी दिले.मंजूर शहर विकास आराखड्यानुसार भार्इंदर पश्चिमेकडील आरक्षण क्र. ९६ वरील सहा हजार चौरस मीटर जागा खेळाच्या मैदानासाठी राखीव ठेवण्याचा ठराव ११ डिसेंबर २००६ च्या महासभेत मंजूर करण्यात आला. यावर, १५ जून २००७ च्या स्थायी समितीच्या बैठकीत खेळाचे मैदान ३० वर्षांच्या बीओटी तत्त्वावर विकसित करण्यासाठी श्री जी एक्झिबिटर्स या विकासकाला मान्यता दिली. खेळाचे मैदान विकसित करून ते वर्षातून ३० दिवस भाडेतत्त्वावर देण्याची मुभा विकासकाला देण्यात आली. तसा करार ३१ जुलै २००७ रोजी करण्यात आला. यापोटी विकासकाने वर्षाकाठी १० लाख भाडे दरवर्षी १५ टक्के वाढीऐवजी पाच वर्षांनंतर १० टक्के वाढीनुसार देण्याचे निश्चित केले. परंतु, विकासकाने त्या जागेवर बेकायदा बांधकाम करून त्यावर मैदानाचा कुठेही उल्लेख न करता ते निश्चित कालावधीपेक्षा जास्त काळासाठी भाडेतत्त्वावर देण्याचा सपाटा सुरू केला. याकडे पालिकेने सतत दुर्लक्ष करून उत्पन्नावर पाणी सोडल्याने हे मैदान पालिकेने ताब्यात घ्यावे, यासाठी माजी नगरसेवक मिलन म्हात्रे यांनी उच्च न्यायालयात २००८ मध्ये जनहित याचिका दाखल केली. त्यावेळी पालिकेने तत्कालीन स्थायी समिती बैठकीत मंजूर केलेला ठराव रद्द करण्यासाठी राज्य सरकारला विनंती केली होती. यावर राज्य सरकारने पालिकेला अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते.पालिकेने राज्य सरकारला पाठवलेल्या अहवालात खोटी माहिती दिल्याची बाब म्हात्रे यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. न्यायालयाने त्या मैदानाच्या वापराबाबतचा अहवाल स्थानिक प्रशासनाकडून मागवण्याचे निर्देश राज्याच्या नगरविकास विभागाला दिले. राज्य सरकारने पालिकेला आठ आठवड्यांत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. परंतु, पालिकेने त्याचा अहवाल मुदतीत सादर न करता तो विलंबाने सादर करून नगरविकास विभागाची दिशाभूल केल्याबाबत म्हात्रे यांनी पुन्हा राज्य सरकारकडे तक्रार केली. त्यावर, राज्याच्या नगरविकास विभागाने या भूखंडाच्या चौकशीसाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेचे तत्कालीन आयुक्त श्रीकर परदेशी यांची एकसदस्यीय चौकशी समिती नियुक्त केली. परदेशी यांनी त्या जागेची गोपनीय पाहणी केली असता विकासकाने त्यावर बेकायदा बांधकाम केल्याचा निर्वाळा देत तसा अहवाल १९ आॅगस्ट २०१३ रोजी पालिकेसह राज्य सरकारला पाठवला. यामुळे प्रशासनाला चांगलाच धक्का बसल्याने राजकीय हितसंबंध असलेल्या श्री जी एक्झिबिटर्सला वाचवण्यासाठी राजकीय धावपळ सुरू झाली. २३ मार्च २०१५ च्या महासभेत माजी महापौर गीता जैन यांच्या अध्यक्षतेखाली सहासदस्यीय समिती स्थापन केली.समितीने जागेची पाहणी करून त्या भूखंडावरील बांधकाम बेकायदा असून मैदानाची जागा ताब्यात घेण्याचा निर्णय घेतला. तसेच श्री जी एक्झिबिटर्सला मैदान विकसित करून पालिकेला देण्याचे आदेश दिले.

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमण