शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
3
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
4
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
5
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
6
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
7
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
8
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
9
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
10
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
11
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
12
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
13
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
14
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
15
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
16
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
17
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
18
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
19
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
20
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे

भाईंदरच्या जनता संवाद कार्यक्रमात नागरिकांच्या समस्यांवर तोडगा

By धीरज परब | Updated: December 1, 2022 19:57 IST

भाईंदर पश्चिमेस डॉ . बाबासाहेब आंबेडकर नगरभवन सभागृहात बुधवारी आमदार गीता जैन यांच्या प्रयत्नांनी जन संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते

 मीरारोड - भाईंदर पश्चिमेस बुधवारी झालेल्या जन संवाद कार्यक्रमात नागरिकांनी आपल्या विविध समस्या मांडल्या . यावेळी पोलीस , महसूल , पालिका आदी अधिकाऱ्यांनी नागरिकांची तक्रार जाणून घेत काहींवर तोडगा काढला . 

भाईंदर पश्चिमेस डॉ . बाबासाहेब आंबेडकर नगरभवन सभागृहात बुधवारी आमदार गीता जैन यांच्या प्रयत्नांनी जन संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . यावेळी आ . जैन सह अपर तहसीलदार नंदकिशोर देशमुख , पालिका उपायुक्त मारुती गायकवाड,  सहायक पोलीस आयुक्त शांतीलाल जाधव ,  वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिलिंद देसाई व  मुगुट पाटील ,  वाहतूक शाखेचे निरीक्षक रमेश भामे, माजी सभापती व भाजपा जिल्हाध्यक्ष ऍड . रवी व्यास , माजी नगरसेवक महेंद्रसिंह चौहान, ओमप्रकाश गाडोदिया , सुरेश खंडेलवाल , जयेश भोईर , प्रतिभा पाटील , गृहनिर्माण संस्थाचे पदाधिकारी , नागरिका उपस्थित होते .  

 

अभिहस्तांतरण प्रक्रिया होऊन सुद्धा जमीन मालकी गृहनिर्माण संस्थेचे नाव सातबारा नोंदी प्रलंबित असल्याच्या काही तक्रारी होत्या . त्यावर महसूल विभागाने लवकर फेरफार करून नाव लावण्याचे आश्वस्त केले . वाहतूक व पार्किंग समस्या गंभीर बनली असून पालिकेने पार्किंगचे धोरण अजून अमलात आणले नाही . त्यामुळे पार्किंग समस्या आणि कारवाई बद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली . महापालिका कागदपत्रांची पडताळणी करत नाही वर कोणतीच सूचना न देता कारवाई साठी येत असल्याचे एका नागरिकाने मांडले . विकास आराखडा बाबत लोकांच्या तक्रारी जास्त होत्या . जुन्या इमारतींचा पुनर्विकास , अभिहस्तांतरण ची जुनी समस्या सोडवण्याची मागणी झाली . काही मोकळ्या जागा वा कोपरे हे व्यसनी - गर्दुल्ले यांचे अड्डे बनल्याच्या मुद्द्यावर पोलिसांनी अश्या ठिकाणी गस्त वाढवावी असे ठरले .  तक्रारींबाबत संबंधित अधिकाऱ्यांबरोबर लवकरात लवकर प्रत्यक्ष जागेचा पाहणी दौरा करणार असल्याचे आ. जैन यांनी सांगितले.