शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

भाईंदरमध्ये कांदळवनाची कत्तल, भराव सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2019 22:42 IST

पालिकेचे दुर्लक्ष : बांधकामांना पुरविल्या जातात प्राथमिक सुविधा, न्यायालयाचे आदेश धाब्यावर

मीरा रोड : कायद्याने असलेली बंदी आणि उच्च न्यायालयाचा आदेश असूनही मीरा-भार्इंदरमध्ये सर्रास कांदळवनाची कत्तल आणि भराव सुरू आहे. राजरोसपणे हा प्रकार सुरू असूनही यंत्रणांचे दुर्लक्ष होत आहे. या बांधकामांना वीजपुरवठा, करआकारणी, पाणी तसेच गटारे, स्वच्छतागृहे, रस्ते आदी सुविधा दिल्या गेल्या आहेत.महापालिकेच्या नगररचना विभागाने तर कांदळवनाचे गुन्हे दाखल असूनही बांधकाम परवानगी दिली आहे. कांदळवन ºहासाचे सर्वात जास्त गुन्हे शहरात दाखल आहेत. भार्इंदर पश्चिमेच्या राधास्वामी सत्संग परिसरात थेट कांदळवनात बेकायदा भराव सुरूच आहे. या ठिकाणी कोकण आयुक्तांच्या कांदळवन संरक्षण उपसमितीमार्फत ८ फेब्रुवारी २०१९ रोजी पाहणी झाली होती. त्यावेळीही जागेवरील कांदळवनात व त्यापासून ५० मीटर अंतरापर्यंत भराव व कुंपणाचे बांधकाम आदी झालेले आढळले होते. त्याआधी तहसीलदार अधिक पाटील, मंडळ अधिकारी दीपक अनारे आदींनी पाहणी केली होती.आधीच्या भराव, बांधकामप्रकरणी गुन्हे दाखल केले गेले नाहीत. त्यातच नव्याने भराव केला जात आहे. आजूबाजूला झुडुपे जाळली जात आहेत. याप्रकरणी आयुक्तांकडे तक्रार केल्यानंतर पालिकेने एका प्रकरणात भार्इंदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. परंतु, याच परिसरातील अन्य उल्लंघन प्रकरणांत गुन्हे दाखल झाले नसून भरावही काढलेला नाही.घोडबंदर येथे अदानी वीज उपकेंद्रामागे तसेच आरएमसी प्रकल्पामागे मोठ्या प्रमाणात कांदळवनाची तोड केली आहे. शिवाय, नव्याने कांदळवन तोडणे सुरूच आहे. त्यातच भूमिपुत्रांकडून कांदळवन, सीआरझेड आहे सांगून कवडीमोलाने जमिनी विकून देणारे दलाल आणि खरेदी करणाऱ्या बड्या मंडळींनी धुमाकूळ घातला आहे. कवडीमोलाने जमीन खरेदी करून त्यावरील कांदळवन तोडून भराव करून भूखंड तयार करायचा आणि तो विकासासाठी मोकळा करून कोट्यवधी रुपये कमवायचे, असा व्यवसाय या भागात जोरात सुरू आहे.संबंधितांवर कारवाईची मागणीकांदळवन, सीआरझेडमधील बेकायदा भराव काढून टाका, येथील बांधकामे हटवा तसेच कांदळवनाची लागवड करून भरतीच्या पाण्याचा प्रवाह मोकळा करण्याची मागणी वनशक्तीचे स्टॅलिन दयानंद, रूपाली श्रीवास्तव, प्रदीप जंगम, इरबा कोनापुरे आदींनी केली आहे. डोळेझाक करणाºया बेजबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करा, असे ते म्हणाले.