शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
2
३४५ राजकीय पक्षांवर टांगती तलवार, निवडणूक आयोग नोंदणी रद्द करणार; वाचा सविस्तर
3
समुद्री महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजगाचा मृत्यू
4
'राजा रघुवंशी याचे आणखी एक प्रेमसंबंध होते'; महिलेने केला मोठा दावा, हत्या प्रकरणी नवा ट्विस्ट
5
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
6
T20I Powerplay New Rule : आता असा ठरवण्यात येणार 'पॉवर प्ले'चा खेळ! जाणून घ्या नवा नियम
7
Video: पाकिस्तानच्या नदीला अचानक पूर आला; फिरायला गेलेले एकाच कुटुंबातील १८ जण वाहून गेले
8
बाजारात तेजीचा 'चौकार'! सेन्सेक्स-निफ्टी सलग चौथ्या दिवशी वाढीसह बंद, 'या' शेअर्सने केलं मालामाल
9
इस्रायलच्या 'ऑपरेशन राइजिंग लॉयन'चा दावा, इराणमध्ये ९००हून अधिक ठिकाणांवर हल्ले, अणुवैज्ञानिकही ठार!
10
अमेरिकेविरोधात रशिया-चीनचा खतरनाक प्लॅन; भारतासाठी धोक्याची घंटा, पुतिन-जिनपिंगचं चाललंय काय?
11
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
12
'ओढत खोलीत घेऊन गेले, पाय पकडले अन्...', कोलकाता बलात्कार पीडितेने सांगितली आपबीती
13
'कोल्हापुरी'सारखी चप्पल विकून वादात अडकली 'प्राडा'; १ लाख रुपयांच्या किंमतीवरून झाला 'राडा'
14
पहिली ते चौथी हिंदी भाषा नको, अजित पवारांची स्पष्ट भूमिका; एकनाथ शिंदेंचं मौन, भाजपामुळे होतेय कोंडी?
15
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
16
वृद्ध महिलांना बांधून ठेवलं, पुरुषांच्या अंगावर कपडेही नाहीत! आश्रमातील धक्कादायक प्रकार उघड
17
मुलं पुढे निघून जातात, ब्रेकअपनंतर मुलींचं लग्न अवघड होतं! अलाहाबाद उच्च न्यायालयानं व्यक्त केली चिंता
18
Viral Video : ताडपत्री अन् झावळ्या बघून झोपडी समजलात का? आत वाकून बघाल तर शॉकच व्हाल!
19
Jagannath Rath Yatra 2025 : जगन्नाथाच्या रथापुढे होते 'सोन्याच्या' झाडूने स्वच्छता; कोणी सुरू केली ही प्रथा? आता कोण करतं? वाचा!
20
Gold Silver Rates 27 June: सोन्या-चांदीच्या दरात आज मोठी घसरण, आता 'इतकी' झाली १० ग्राम सोन्याची किंमत

भाईंदरच्या नाट्यगृहाचे रविवारी भूमीपूजन

By admin | Updated: August 25, 2015 23:01 IST

नाट्य संस्कृतीला वाव मिळून त्यात वाढ होण्याच्या उद्देशाने शहरात नाट्यगृह साकारण्यासाठी आ. प्रताप सरनाईक यांनी गेल्या ६ वर्षांपासून पालिकेकडे केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून

- राजू काळे ल्ल भाईंदरनाट्य संस्कृतीला वाव मिळून त्यात वाढ होण्याच्या उद्देशाने शहरात नाट्यगृह साकारण्यासाठी आ. प्रताप सरनाईक यांनी गेल्या ६ वर्षांपासून पालिकेकडे केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून ३० आॅगस्ट रोजी सकाळी ११.३० वा.च्या सुमारास सांस्कृतिकमंत्री विनोद तावडे व पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात येणार आहे.पालिकेने डीबी रिअ‍ॅलिटी या विकासक कंपनीला मौजे महाजनवाडी येथे भव्य गृहप्रकल्प बांधण्याची परवानगी दिली होती. या परवानगीपोटी विकासकाने पालिकेला नागरी सुविधा भूखंडाच्या माध्यमातून सुमारे ७ हजार चौमी जागा नाट्यगृहासाठी देणे अपेक्षित होते. परंतु, यातील एक फुटाची जागाही विकासकाने पालिकेला न देता ती गिळंकृत करण्याचा डाव पालिकेतील भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या संगनमताने साधला होता. विकासकाने लाटलेली जागा पालिकेच्या ताब्यात मिळून त्यावर नाट्यगृह व्हावे, यासाठी आ. प्रताप सरनाईक यांनी गेल्या ६ वर्षांपासून पालिकेकडे पाठपुरावा सुरू ठेवला होता. प्रसंगी आंदोलन छेडून पालिकेची नाकाबंदीसुद्धा केली होती. परंतु, प्रशासनाने केवळ कागदी कारवाई करून वेळ मारून नेत नागरिकांच्या तोंडाला पाने पुसण्याचा कारभार चालविला होता. पालिकेच्या या दुटप्पी भूमिकेवर संतापलेल्या आ. सरनाईक यांनी २०१४ मध्ये तत्कालीन आयुक्त सुभाष लाखे यांच्या दालनाबाहेरच ठिय्या आंदोलन पुकारल्याने प्रशासनाची चांगलीच गोची केली होती. त्या वेळी प्रशासनाने डी.बी. रिअ‍ॅलिटी या विकासक कंपनीच्या गृहप्रकल्पाची बांधकाम परवानगी रद्द करण्याची कार्यवाही सुरू केली होती. बांधकाम विकासकाकडून करण्यात येणार आहे. परंतु, त्यातील अंतर्गत कामे पालिकेच्या निधीतून करण्यात येणार असून यंदाच्या अंदाजपत्रकात त्यासाठी १ कोटीची तरतूद करण्यात आली आहे. येत्या दोन वर्षांत हे नाट्यगृ साकारणार असून त्यामुळे महानगरातील संस्कृतीत विश्वाला नवी झळाळी प्राप्त होणार आहे. या अत्याधुनिक वास्तूची आवश्यक ती काळजी ती साकार झाल्यानंतर घेण्याची खबरदारी महापालिकेने आधीच घ्यायला हवी, अन्यथा त्याची दुरावस्था अन्य महापालिकांनी साकारलेल्या नाट्यगृहांसारखी होईल. बांधकाम परवानगी रद्द होण्याच्या भीतीपोटी विकासकाने सुमारे ७ हजार चौमी जागेपैकी ४ हजार ८०० चौमी जागा पालिकेच्या ताब्यात दिली आहे. या भूखंडावर सुमारे १२०० आसनक्षमता असलेल्या तीन मजली भव्य व सुसज्ज नाट्यगृहासह सुमारे १५० आसनक्षमता असलेले मिनी थिएटर बांधण्यासाठी प्रशासनाने त्याचा नकाशा तयार केला आहे. यान नाट्यगृहाचा आराखडा ठाण्याचे वास्तुविशारद शशिकांत देशमुख यांच्यामार्फत तयार करण्यात आला.