शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
3
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
4
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
5
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
6
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
7
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
8
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
9
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
10
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
11
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
12
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
13
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
14
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
15
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
16
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
17
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
18
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
19
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
20
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
Daily Top 2Weekly Top 5

भाऊ गणपत वाचनालय इतिहासजमा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2018 01:31 IST

शासनाच्या दुर्लक्षित धोरणामुळे या वाचनालयाचे आणि पुस्तकांचे आता फक्त भग्न अवशेषच शिल्लक दिसतात.

मुरबाड : भारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश साम्राज्याविरु द्ध लढण्यात अनेकांना प्रेरणादायी ठरलेले आणि राज्यातील हाताच्या बोटांवर मोजता येतील, अशा शतकापूर्वीच्या सार्वजनिक वाचनालयांपैकी एक असलेले मुरबाडचे ऐतिहासिक भाऊ गणपत वाचनालय. मात्र, एवढी समृद्ध परंपरा असूनही हे वाचनालय सध्या अखेरची घटका मोजत आहे. ११८ वर्षांपूर्वीच्या या वाचनालयात एकेकाळी मोठी साहित्यसंपदा होती. मात्र, शासनाच्या दुर्लक्षित धोरणामुळे या वाचनालयाचे आणि पुस्तकांचे आता फक्त भग्न अवशेषच शिल्लक दिसतात.मुरबाड शहरातील जुन्या तहसील कार्यालयासमोरील जिल्हा परिषद शाळेच्या बाजूच्या मोकळ्या जागेत २ जानेवारी १८९४ रोजी जिल्ह्याचे तत्कालीन कलेक्टर सिळकाळ यांच्या हस्ते भाऊ गणपत वाचनालयाच्या पायाभरणीचा कार्यक्र म करण्यात आला होता. १९०१-०२ मध्ये बांधकाम पूर्ण होऊन वाचनालय सुरू करण्यात आले. स्वातंत्र्यसंग्राम काळात सुरू झालेल्या या वाचनालयातील वाङ्मयसंपदेमुळे प्रभावित होऊन मुरबाडमधील अनेकांनी स्वातंत्र्य चळवळीत स्वत:ला झोकून दिले. या ऐतिहासिक वाचनालयात ज्ञानकोषागार केतकर यांचे खंड, महात्मा फुले यांचे समग्र वाङ्मय, विविध ग्रंथ, क्र ांतिकारकांचे तत्कालीन साहित्य, कथा, कादंबऱ्या अशी सुमारे सात हजार पुस्तके होती, अशी माहिती काही जुन्या वाचकांनी दिली.काही वर्षांपूर्वी या वाचनालयाचे छप्पर पावसामुळे गळून पडले. त्यामुळे आतील सगळी पुस्तके, ग्रंथ पाण्यामुळे पूर्णपणे कुजले. वाचनालयाच्या या अवस्थेकडे लक्ष देण्यास तत्कालीन मुरबाड ग्रामपंचायतीसह कोणालाच वेळ मिळाला नाही. यातील काही १० ते १२ पुस्तके मुरबाड नगरपंचायतीकडे शिल्लक आहेत. बाकी सगळी साहित्यसंपदा पाण्यात गेली. पुस्तकांनी भरलेल्या या वाचनालयाने शतकाचा उंबरठा पार पडल्यानंतर काही वर्षांपूर्वी राज्यातील इतर वाचनालयांबरोबर महाराष्ट्र सरकारने या वाचनालयाचा गौरव करून पाच लाखांचा निधी दिला होता. तरीही, हे ऐतिहासिक वाचनालय पुन्हा उभे राहिले नाही.सात वर्षांपूर्वी मुरबाड ग्रामपंचायतीच्या जुन्या कार्यालयात एका छोट्याशा खोलीत हे वाचनालय सुरू करण्यात आले असले, तरी त्याठिकाणी १५-२० पुस्तके आणि रोजच्या वृत्तपत्रांची रद्दीच दिसते. शतकापूर्वीच्या या वाचनालयाला पुन्हा पूर्वीचे गतवैभव मिळावे, यासाठी मुरबाड नगरपंचायत आणि प्रशासनाने प्रयत्न करावेत, अशी अनेक वाचनप्रेमींची अपेक्षा आहे.मुरबाडचे ऐतिहासिक भाऊ गणपत वाचनालय हे बंद असल्यामुळे तालुक्यातील वाचकवर्गाची मोठी गैरसोय होत आहे. या वाचनालयाच्या नूतन इमारतीसाठी सुमारे एक कोटी ३० लाखांचे अनुदान शासनाकडून मंजूर झाले असून थोड्या दिवसांत ते काम सुरू करण्यात येईल.-मोहन सासे, नगराध्यक्ष नगरपंचायत मुरबाड

टॅग्स :thaneठाणे