शहरं
Join us  
Trending Stories
1
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
2
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
3
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
4
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
5
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
6
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
7
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
8
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
9
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
10
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
11
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
12
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
13
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
14
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
15
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
16
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
17
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
18
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
19
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
20
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
Daily Top 2Weekly Top 5

भार्इंदर विकास आराखडा,ग्रामस्थांच्या हरकती, सुनावणी बेकायदा असल्याचा दावा, एमएमआरडीएचा निषेध,  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2017 05:55 IST

मीरा रोड : भार्इंदरच्या नगरभवनात सोमवारी ठेवलेल्या सुनावणीवेळी ग्रामस्थांनी एमएमआरडीएच्या विकास आराखड्याचा जोरदार निषेध केला. ही सुनावणीच बेकायदा असून हरकत घेणाºयांना रितसर पत्रे देऊन व्यक्तिगत सुनावणी ठेवा, अशी मागणी ग्रामस्थांनी केल्याने वातावरण तंग बनले. अखेर जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना पाचारण करावे लागले.एमएमआरडीएने संपूर्ण मुंबई महानगर प्रदेशासाठी प्रादेशिक योजना अर्थात विकास ...

मीरा रोड : भार्इंदरच्या नगरभवनात सोमवारी ठेवलेल्या सुनावणीवेळी ग्रामस्थांनी एमएमआरडीएच्या विकास आराखड्याचा जोरदार निषेध केला. ही सुनावणीच बेकायदा असून हरकत घेणाºयांना रितसर पत्रे देऊन व्यक्तिगत सुनावणी ठेवा, अशी मागणी ग्रामस्थांनी केल्याने वातावरण तंग बनले. अखेर जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना पाचारण करावे लागले.एमएमआरडीएने संपूर्ण मुंबई महानगर प्रदेशासाठी प्रादेशिक योजना अर्थात विकास आराखडा तयार केला असून १९ सप्टेंबर २०१६ ला तो प्रसिध्द केला. हरकती व सूचनांवर एमएमआरडीएच्या वांद्रे येथील कार्यालयात सुनावणी घेण्यात आली होती. परंतु मोठ्या संख्येने ग्रामस्थ जमल्याने गोंधळ उडाला. त्यानंतर तालुकानिहाय सुनावणी घेण्याचे एमएमआरडीएने जाहीर केले. आराखड्याबाबत एमएमआरडीएकडे ६३ हजार ३०० हरकती व सूचना आल्या आहेत. त्यात मनोरीपासून गोराई, उत्तन, चौक, पाली आदी गावांमधूनच १२ हजार तर वसई भागातून ३८ हजार हरकती नोंदवण्यात आल्या आहेत.भार्इंदरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगरभवनात एमएमआरडीएने सोमवारी गोराई, उत्तन, मनोरी भागातील हरकती किंवा सूचना करणाºयांसाठी जाहीर सुनावणी ठेवली होती. सकाळी माजी नगरसेवक मीलन म्हात्रे, शिलोत्री संघाचे अध्यक्ष अशोक पाटील यांच्यासह भास्कर भोईर, नंदकुमार पाटील आदी मुर्धा, राई आणि मोर्वा भागातील ग्रामस्थांनी हरकती नोंदवल्या. यात मुर्धा ते मोर्वा रस्ता ३० मीटर रुंद करण्यास विरोध करण्यात आला. यासाठी घरे तोडली जाण्याची भीती ग्रामस्थांत आहे.मोठ्या प्रमाणात नागरीकरण झाल्यास समस्या गंभीर बनतील, वाहतुक कोंडी वाढेल, आताच मुलभूत सुविधांची वानवा असताना लोकसंख्येची भर पडल्यास हालात भर पडेल, शिवाय सीआरझेड, कांदळवन व पाणथळ क्षेत्राचा ºहास होऊन पर्यावरणाची मोठी हानीहोईल.स्थानिकांचे पारंपरिक व्यवसाय बंद पडतील, असे मुद्दे मांडण्यात आले. भाजपाच्या नयना म्हात्रे, विनोद म्हात्रे, जयेश भोईर आदी काही नगरसेवकांनीही सुनावणीला हजेरी लावली होती.मच्छीमारांचा विरोध; वातावरण तंग झाल्याने पोलीस फाटासुनावणीला उत्तन, पाली, चौक, गोराई भागातून मोठ्या संख्येने ग्रामस्थ आले. त्यांनी संतप्तपणे एमएमआरडीएच्या आराखड्याचा निषेध करण्यास सुरवात केली. यात मच्छीमार समाजातील महिलांची संख्या मोठी होती. त्यांच्यासोबत शिवसेना नगरसेविका शर्मिला बगाजी व हेलन गोविंद यांच्यासह वसई पर्यावरण संवर्धन समितीचे समीर वर्तक, शशी सोनावणे, संदीप बुरकेन आदी होते. महिला व ग्रामस्थांनी सभागृहातही जोरदार विरोध दर्शवत ही सुनावणीच बेकायदा असल्याचे ठणकावले.मासेमारीचा हंगाम सुरू झाल्याने मच्छीमार त्यात व्यस्त आहेत. तालुक्याच्या ठिकाणी सुनावणी घेताना त्या भागातील सर्व हरकतदारांना लेखी पत्र द्यायला हवे होते, पण छोटी जाहिरात देऊन सुनावणीचा फार्स करण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. वातावरण तंग बनल्याने पोलीस फाटा बोलावण्यात आला होता.वरिष्ठांना कळवणारआमचा या सुनावणीलाच विरोध आहे. मुख्यमंत्र्यांसोबत चर्चेची वेळही दिली गेलेली नाही.प्रत्येक हरकतदाराला लेखी पत्र देऊन व्यक्तिगतरित्या सुनावणी घ्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी एमएमआरडीएच्या अधिकाºयांसमोर आक्रमकपणे मांडली.त्यावर आम्ही वरिष्ठांना याबाबत कळवू, असे आश्वासन अधिकºयांनी दिले.अधिकाºयांच्या या आश्वासनाचे आता पुढे काय होते याकडे साºयांचे लक्ष आहे.