शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

भार्इंदरपाडा मैदानाचा प्रस्ताव रद्द होणार

By admin | Updated: June 27, 2017 03:17 IST

भार्इंदरपाडा येथील खेळाचे मैदान शिवसेनेच्या एका नेत्याला देण्याचा प्रस्ताव मागील महिन्यात झालेल्या महासभेत सत्ताधाऱ्यांनी

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : भार्इंदरपाडा येथील खेळाचे मैदान शिवसेनेच्या एका नेत्याला देण्याचा प्रस्ताव मागील महिन्यात झालेल्या महासभेत सत्ताधाऱ्यांनी रेटून मंजूर करुन घेतला होता. परंतु, या प्रस्तावाविरोधात प्रशासनावर टीका झाल्यानंतर आणि ‘लोकमत’ने या प्रस्तावाविरोधात आवाज उठविल्यानंतर अखेर हा प्रस्तावच रद्द करण्याच्या हालचाली पालिका प्रशासनाने सुरु केल्या आहेत. राष्ट्रवादीने या प्रस्तावाविरोधात न्यायालयात जाण्याची तयारी केली होती. तसेच, भाजपासह ठाण्यातील क्रीडाप्रेमींनीही पालिकेच्या या भूमिकेबद्दल संशय व्यक्त केला होता. भार्इंदरपाडा येथील मैदान शिवसेना नेत्याच्या कंपनीला नाममात्र दरात भाडेतत्वावर देण्याचा वादग्रस्त प्रस्ताव पालिका प्रशासनाने मागील महिन्यांतील महासभेत मांडला होता. या प्रस्तावाच्या संदर्भात वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर भाजपासह राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी त्याला विरोध केला होता. तसेच शिवसेनेच्या काही नगरसेवकांनीदेखील या विरोधात भूमिका घेतली होती. असे असतांनादेखील यावर चर्चा न करताच हा प्रस्ताव गोंधळात मंजूर केला होता. ३० वर्षांनी भाडेतत्वावर देताना पालिका प्रशासनाने निविदा प्रक्रिया का राबविली नाही, एकाच ठराविक संस्थेला विशिष्ट अटीशर्ती आखून हे मैदान भाड्याने देण्याचा निर्णय सर्वांना समान न्याय या तत्वाला हरताळ फासणारा नाही का, या निर्णयाचा फायदा घेऊन खेळाची अन्य मैदाने बळकावली जातील, असे अनेक प्रश्न क्रीडाप्रेमींसह विरोधकांनी केले होते. भाजपचे आमदार संजय केळकर यांनी हा प्रस्ताव रद्द करावा, असे पत्र आयुक्त संजीव जयस्वाल यांना दिले होते. तर, शिवसेनेच्या निर्णयाविरोधात न्यायालयात धाव घेण्याची तयारी विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील यांनी केली होती.