शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
हिंदी सक्तीचा शासन निर्णय मागे; ५ जुलैला होणारा ठाकरे बंधुंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
3
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
4
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
5
Shefali Jariwala Death:अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
6
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
7
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
8
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
9
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
10
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
11
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
12
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 
13
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
14
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
15
ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसांत मिळतो? एका क्लिकवर जाणून घ्या तुम्हाला किती पैसे मिळणार?
16
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
17
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
18
जगातील सर्वात धोकादायक रस्ते, इथून चालतानाही उडतो थरकाप, यातील एक रस्ता आहे भारतात
19
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
20
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव

भानभित्रानी भरलंय सारं रान

By admin | Updated: October 12, 2016 04:22 IST

शहापूर तालुक्याच्या जंगलात सर्वत्र रानातील रानमेवा म्हणून परिचित असलेली काळीभोर भानभित्रे नावाची लहानलहान फळे सर्वत्र पाहवयास मिळत

भातसानगर : शहापूर तालुक्याच्या जंगलात सर्वत्र रानातील रानमेवा म्हणून परिचित असलेली काळीभोर भानभित्रे नावाची लहानलहान फळे सर्वत्र पाहवयास मिळत असून शेतावर कापणीसाठी गेलेले शेतकरी त्यावर ताव मारत असल्याचे पहावयास मिळत आहे.तालुक्यातील जंगलमय भागात मोठ्या प्रमाणात दिसणारी भानभित्रे ही झाडावर गुच्छाच्या रु पात आढळतात. सुरुवातीला ती हिरवीगार असतात. एका एका गुच्छ्यात ती दीडशे ते दोनशे फळे असतात. ती भातिपकाच्या कापणीच्या वेळी पिकून काळीभोर होतात. ती खायला गोड पण थोडीशी तुरट असतात. परंतु, ती खायची मजा मात्र औरच असते. या फळात लहानलहान चार बियाही असतात, त्या टाकून दिल्या की भानभित्रे खाल्ल्याचे समाधान वेगळेच. आज तालुक्याच्या भातसानगर, कसारा, तानसा, वैतरणासह साऱ्याच जंगलमय भागात ती मोठ्याप्रमाणात आढळत आहेत. ती खाण्यासाठी गुरे चारणारी, बकऱ्या चारणारे दररोज दाट जंगलात जात आहेत. येताना पानाच्या डोम्यात (द्रोण) आणून आनंद घेत असल्याचे पहावयास मिळत आहे. या फळामुळे घशाचे आजार होत नाहीत, असे जाणकार लोक सांगतात. त्याचा जो गोड रस असतो तो कफाचे पाणी करून शरिराला ताजेतवाने करतो, असे शेतकरी सांगतात. (वार्ताहर)