शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

भालचंद्र नेमाडे यांच्या साहित्य लाटेचे दिवस भरले - राजन खान यांचे प्रतिपादन  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 06:22 IST

कोणत्याही साहित्य प्रकाराची लाट फार तर २२ वर्षे चालते. मराठी साहित्यात भालचंद्र नेमाडे यांच्या साहित्याची लाट असल्याचे मानले जात होते. तिला २२ वर्षे झाली. त्यामुळे त्यांच्या साहित्य लाटेचे दिवस भरले आहे, असे खळबळजनक प्रतिपादन ज्येष्ठ सर्जनशील लेखक राजन खान यांनी रविवारी येथे केले.

कल्याण : कोणत्याही साहित्य प्रकाराची लाट फार तर २२ वर्षे चालते. मराठी साहित्यात भालचंद्र नेमाडे यांच्या साहित्याची लाट असल्याचे मानले जात होते. तिला २२ वर्षे झाली. त्यामुळे त्यांच्या साहित्य लाटेचे दिवस भरले आहे, असे खळबळजनक प्रतिपादन ज्येष्ठ सर्जनशील लेखक राजन खान यांनी रविवारी येथे केले.सार्वजनिक वाचनालय आणि अक्षरमानव यांच्या लेखन कार्यशाळेत ते बोलत होते. तुम्ही इतरांचा द्वेष करता तीही हिंसाच आहे. एखादी व्यक्ती दुसºया जातीची आहे, असे समजता तेव्हा तुम्ही हिंसाच करीत असता. संकुचित पिढीने लिहिलेले साहित्यही संकोचानेच येते. असे साहित्य काळाच्या कसोटीवर टिकणे शक्य नाही. चांगले लिहिण्यासाठी मेंदूने उदात्त होणे आणि माणूस होणे गरजेचे आहे. सगळ््या भाषा आपल्याच असतात. तसा प्रत्येक भाषेतील लेखकही आपला असतो. हा उदात्त हेतू ज्यांच्या साहित्यात होता, ते लेखकच टिकले. हिंसक लोक येतात व जातात. पण माणूस म्हणून जगण्याची सवय लावा, असा सल्ला त्यांनी कार्यशाळेत दिला.कथा, कादंबरी, कविता यात मूलत: एक कथाच असते. गोष्ट हा जगण्याचा मूलभूत पाया आहे. आपल्याला लेखक व्हायचे आहे. हा विचार डोक्यातून काढून टाका. लेखकाला जर तंत्रशैली सुचली नाही, तरी प्रथमत: जे सुचते ते कागदावर उतरवा. चांगला लेखक होण्यासाठी एका जागेवर ठिय्या मांडून बसण्याची ताकद हवी, असा सल्ला खान यांनी नवोदितांना दिला.कविता शिकवता येत नाही. ती अंगी असावी लागते. कवितेची कार्यशाळा गर्भसंस्कारासारखी असते. तसे संस्कार कवितेवर झाल्यास ती अधिक सशक्त आणि सदृढ बनते, असे नारायण लाळे यांनी सुचवले. सोशल मीडियावरील प्रतिक्रियांचे निकष कवितेला लावू नका आणि गटातटांच्या राजकारणाला बळी पडू नका. त्यात नवोदित कवी भरकटत जातील आणि त्यांची कविता मरण पावेल, याकडे त्यांनी लक्ष वेधले.कविता चांगली की वाईट ही शोधता आली पाहिजे. प्रसिध्दीच्या मागे लागला नाहीत, तरी चांगली कविता प्रसिद्धी मिळवतेच. कविता हे लेखनव्रत आहे. ती जगणे म्हणजे जखम आणि जोखीम आहे. कवितेत वेगळेपणा महत्त्वाचा. ज्येष्ठांचे, अन्य साहित्यिकांचे वाचले नाही, तर कविता समृद्ध कशी होणार, असा सल्ला राजीव जोशी यांनी दिला.कथा बाळबोध, पाल्हाळीक नसावी. त्यात तपशील हवा पण साद्यंत घटनाक्रमाचा अट्टहास नको, यावर सुबोध जावडेकर यांनी भर दिला. तपशील जास्त असले, तर कथा सीमित होते. त्यात वाचक सहभागी होणे महत्त्वाचे असते. त्यामुळे त्या दृष्टीने कथा लिहिण्याचा सल्ला त्यांनी दिला. कादंबरी ज्या विषयावर लिहायची असेल त्या चौकटीत स्वत:ला बसावा; तरच अनुभव मांडता येतील. मानवी जीवनाचे सखोल चित्रण कादंबरीत व्हावे, अशी अपेक्षा डॉ. महेश केळुस्कर यांनी व्यक्त केली.या कार्यशाळेला कोल्हापूर, नाशिक, पुणे, धुळे, मुंबई अशा विविध भागातून साधारण १०० च्या आसपास नवोदित लेखकांनी हजेरी लावली. दोन वर्षांच्या प्रयत्नांनंतर ही कार्यशाळा भरवल्याचे सांगत तिचा नवोदितांना फायदा होईल, असे वाचनालयाचे पदाधिकारी भिकू बारस्कर यांनी सांगितले.