शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

भाईंदरचे मासळी मार्केट उद्घाटनाच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2019 00:30 IST

अडीच महिन्यापूर्वी बांधली इमारत : भरपावसात विक्रेते रस्त्यावर बसणार, वाहतूककोंडीमुळे नागरिक त्रस्त

भार्इंदर : भार्इंदर पूर्वेच्या खारीगाव मासळी मार्केटची तळमजली इमारत बांधून अडीच महिने झाले तरी उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. पावसाळा सुरू झाला तरी उद्घाटन न झाल्याने विक्रेत्यांना भर पावसात रस्त्यावर मासळी विकण्याची वेळ आली आहे. तर मासळी मार्केट सुरू करण्याची मागणी शिवसेना नगरसेवक कुसुम गुप्ता व धनेश पाटील यांनी केली आहे.

खारीगावातील बाजार व औद्योगिक वसाहतीत असलेले खारीगाव मासळी मार्केट हे ग्रामपंचायतीच्या काळापासूनचे आहे. या मार्केटच्या नूतनीकरणासाठी अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरू होते. पालिका कर वसुली करायची तर ग्रामस्थां कडून ही जागा गावकीची असल्याचा दावा केला होता. मात्र ही जागा स्थानिकांच्या मालकीची निघाल्याने अखेर पालिकेने त्याला जागेचा पैशांच्या स्वरूपात सुमारे २५ लाखांचा मोबदला देत जागा खरेदी केली. जागेच्या मालकीचा वाद मिटल्याने अनेक वर्ष पुनर्विकासाच्या प्रतीक्षेत असलेल्या मासळी मार्केटच्या विकासाचा मार्ग मोकळा झाला. २०१७ मध्ये मार्केट बांधण्यासाठी महासभेने ६४ लाख ३९ हजाराच्या खर्चास मंजुरी दिली. पालिकेने नेमलेल्या कंत्राटदाराने मार्केटचे बांधकाम पूर्ण करून सुमारे अडीच महिने झाले. परंतु हे काम सुरू झाल्यापासून मासळी विकणाऱ्या महिला या रस्त्यावरच बसून मासळी विकतात.कडक उन्हाळा या विक्रेत्यांनी रस्त्यावरच काढला. आता पावसाळा सुरू झाला तरी मार्केट सुरु करण्याचे पालिका नाव काढत नसल्यान ेविक्रेत्या संतापल्या आहेत. मार्केट तयार झाले असताना आता पावसाळाही रस्त्यावरच भिजत काढायचे का ? असा सवाल त्या करत आहेत. त्यातच रस्त्यावर मासळी बाजार भरत असल्याने आधीच अरूंद रस्त्यावर वाहतूककोंडी होत आहे. नागरिकांना चालणे जिकरीचे झाले आहे. शिवसेना नगरसेविका कुसुम गुप्ता व धनेश पाटील यांनी मासळी मार्केट त्वरित खुले करण्याची मागणी केली आहे. कुसुम यांनी आयुक्तांना पत्र दिले आहे. उद्धाटनाची वाट न पाहता मार्केट सुरू करण्याचा पवित्रा विक्रेत्यांनी घेतला आहे. 

टॅग्स :thaneठाणेbhayandarभाइंदर