शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

कलानीना शह देण्यासाठी भगवान भालेराव यांची शरद पवार भेट, उलटसुलट चर्चेला उधाण

By सदानंद नाईक | Updated: September 24, 2024 17:52 IST

शरद पवार कुणाला तिकीट देणार याबाबत सर्वत्र चर्चा

सदानंद नाईक, उल्हासनगर: कलानी कुटुंबानंतर आता रिपाइं आठवले गटातून हकालपट्टी झालेल्या भगवान भालेराव यांनी मंगळवारी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची भेट घेतली. विधानसभेसाठी भालेराव इच्छुक असून कट्टर समर्थक कलानी यांच्या व्यतिरिक्त इतरांना शरद पवार विधानसभेचे तिकीट देणार का? अशी चर्चा शहरात रंगली आहे.

उल्हासनगर रिपाइं आठवले गटाचे शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव विधानसभा मतदारसंघासाठी इच्छुक आहेत. यापूर्वीही त्यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती. दरम्यान पप्पू कलानी, ओमी कलानी, पंचम कलानी यांनी नुकतीच शरद पवार यांची भेट घेतल्यावर, ओमी कलानी यांनी तुतारीवर निवडणूक लढविणार असल्याचे जाहीर केले. शरद पवार यांचे कट्टर समर्थक म्हणून पप्पु कलानी यांच्याकडे पाहिले जाते. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निरीक्षक भगवान टावरे यांच्या समवेत भगवान भालेराव यांनी मंगळवारी सकाळी शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीने कलानी यांना शह देण्याचा प्रयत्न भालेराव यांनी केला. तसेच तुतारीवर निवडणूक लढविणार असल्याचे भालेराव यांनी जाहीर केल्यावर, कलानी की भालेराव या उलटसुलट चर्चेलाही शहरात सुरवात झाली.

उल्हासनगर मतदारसंघात सिंधी समाज बहुसंख्य असला तरी, अमराठी टक्का ६० टक्क्यांवर गेला आहे. तसेच सिंधी समाज मतदान करण्यास घराबाहेर पडत नसल्याची टीका नेहमी होते. कलानी-आयलानी ऐवजी मराठी चेहऱ्याच्या उमेदवार हवा, या मागणीने जोर पकडल्याचे शहरात बोलले जाते. राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार हे कलानी कुटुंबावर पुन्हा एकदा विश्वास दाखवितात की, भालेराव यांच्याकडे वळतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कलानी यांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळाल्यास मतदारसंघात अटीतटीची लढत होणार असल्याचेही चर्चा आहे.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारulhasnagarउल्हासनगर