शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

भावोजींना सिद्धिविनायक पावल्याने शिवसेनेत अस्वस्थता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2017 01:58 IST

शिवसेना सचिव व होम मिनिस्टरफेम भावोजी आदेश बांदेकर यांची सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याने दादरमधील शिवसेनेच्या नेत्यांमध्ये अस्वस्थता आहे

ठाणे : शिवसेना सचिव व होम मिनिस्टरफेम भावोजी आदेश बांदेकर यांची सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याने दादरमधील शिवसेनेच्या नेत्यांमध्ये अस्वस्थता आहे. आगामी काळात सदा सरवणकर यांना दूर करून दादरमध्ये पुन्हा बांदेकर यांना प्रस्थापित करण्याकरिता पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आशीर्वादाने त्यांची नियुक्ती केल्याचे बोलले जात आहे.न्यासावर यापूर्वी काम केलेल्या विशाखा राऊत तसेच राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेनेत दाखल झालेले सुभाष मयेकर उत्सुक असताना त्यांना डावलून बांदेकरांची नियुक्ती केल्याचे बोलले जाते. बांदेकर यांच्याकडे शिवसेनेचे सचिवपद, रायगड जिल्हा संपर्कप्रमुखपद, चित्रपट सेना अध्यक्षपद, अंधेरी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचे महापालिका ट्रस्टी अशी पदे असताना त्यांच्या न्यासावरील नियुक्तीने दादरचे शिवसैनिक अस्वस्थ आहेत. ‘शिवसेना संपवण्यासाठी आलेल्यांना पदे दिली जात असून आंदोलने, मारामाºया, पोलीस केसेस आणि मार खाल्ला, निवडणुकीत जीव तोडून काम केले, असे शिवसैनिक बेकार आहेत. राजा तुपाशी, प्रजा उपाशी, अशी सध्याची परिस्थिती असून बाळासाहेबांचे आदेश आठवा. अन्याय सहन करू नका. पेटून उठा’, असे संदेश सध्या व्हॉट्सअ‍ॅपवर फिरत आहेत. बांदेकर हे छोट्या पडद्यावरील शूटिंगमध्येही व्यस्त असतात. सिद्धिविनायक मंदिराच्या अध्यक्षाला मदतीच्या अर्जांपासून, सुरक्षेच्या मुद्द्यांपर्यंत अनेक विषय रोज हाताळावे लागतात. त्यांच्याकडे अगोदरच इतकी जबाबदारी असताना ते यासाठी वेळ काढतील किंवा कसे, असा सवाल केला जात आहे.पनवेलच्या निवडणुकीची जबाबदारी बांदेकर यांच्याकडे होती. त्यात सेनेला भोपळाही फोडता आला नाही. इतके अपयश मिळूनही बांदेकर यांना पद देऊन पक्षाने चुकीचा संदेश दिल्याचे बोलले जात आहे.