शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

‘बेटी बचाव’चा १३,५०० मुलींना लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2018 02:27 IST

ठाणे महापालिकेने बेटी बचाव बेटी पढाव, असा नारा दिला आहे. त्यानुसार, शहरातील ज्यांचे उत्पन्न एक लाखापेक्षा कमी असेल आणि ज्यांनी दोन मुलांचा नियम पाळला असेल, त्यांच्यासाठी राजमाता जिजाऊ बेटी बचाव बेटी पढाव, ही योजना पुढे आणली आहे.

ठाणे : ठाणे महापालिकेने बेटी बचाव बेटी पढाव, असा नारा दिला आहे. त्यानुसार, शहरातील ज्यांचे उत्पन्न एक लाखापेक्षा कमी असेल आणि ज्यांनी दोन मुलांचा नियम पाळला असेल, त्यांच्यासाठी राजमाता जिजाऊ बेटी बचाव बेटी पढाव, ही योजना पुढे आणली आहे. त्यानुसार, अशा मुलींच्या जन्मापासून लसीकरण, शालेय शिक्षण, पदवी व विवाह अशा विविध स्तरांवर आर्थिक साहाय्य देण्याचा निर्णय घेतला आहे.शहरातील मुलांचा वार्षिक जन्मदर लक्षात घेऊन यंदा या योजनेंतर्गत १३ हजार ५०० मुलींना अर्थसाहाय्य देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.ठाणे महापालिका हद्दीत एक हजार मुलांमागे मुलींचा जन्मदर हा साधारणपणे ९५० ते ६० च्या आसपास आहे. त्यामुळे तो वाढवण्यासाठी पालिकेच्या माध्यमातून विविध स्वरूपाचे प्रयत्न सुरू आहेत. आता तो वाढवण्याबरोबरच त्यांना उच्च शिक्षण घेता यावे, यासाठी महापालिकेने ही योजना पुढे आणली आहे.महापालिका क्षेत्रात वार्षिक साधारणपणे २७ हजार मुले जन्माला येतात, त्यापैकी ५० टक्के म्हणजे १३,५०० मुलींना ही योजना लागू करण्यात येणार आहे. त्यानुसार, प्रत्येक टप्प्यावर पाच हजार याप्रमाणे एका मुलीला तिच्या जन्मापासून विवाहापर्यंतच्या कालावधीत २५ हजार आर्थिक अनुदान देण्यात येणार आहे. यामुळे मुलींच्या जन्माचे स्वागत व उत्तम आरोग्य, शिक्षण यास आधार मिळेल आणि मुलींचा जन्मदरदेखील वाढेल, अशी आशा पालिकेला आहे. त्यासाठी चार कोटींची तरतूद प्रस्तावित केली आहे.>२० हजार किशोर मुलींना देणार रुबेला लसठाणे महापालिकेच्या शाळांतील अंदाजे १० हजार व खाजगी शाळांतील अंदाजे १० हजार अशा एकूण २० हजार मुलींना प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून रुबेला लस देण्याचा निर्णयदेखील पालिकेने घेतला आहे. यासाठी एक कोटींची तरतूद प्रस्तावित केली आहे.