शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

बेथल चर्च रस्त्याचे रखडलेले काम अखेर सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2020 23:13 IST

बदलापूर : अंबरनाथमध्ये ज्या पाच मुख्य रस्त्यांसाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) निधीची तरतूद केली आहे, त्यातील बेथल ...

बदलापूर : अंबरनाथमध्ये ज्या पाच मुख्य रस्त्यांसाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) निधीची तरतूद केली आहे, त्यातील बेथल चर्च रस्त्याचे काम रखडले होते. याठिकाणी असलेल्या इमारतींचे बांधकाम या रस्त्याच्या आड येत होते. त्यातील सहा मालमत्ताधारकांनी मुंबई उच्च न्यायालयात दाद मागितल्याने अडचणीत वाढ झाली होती. पालिकेने रस्त्याचे काम रखडणार नाही, या अनुषंगाने तोडगा काढला. १८ मीटरऐवजी सध्या १२ मीटर रस्त्याचे काम करण्यास सुरुवात केली आहे.त्यामुळे वर्षभरापासून रखडलेल्या रस्त्याचे काम सुरू झाले आहे.

अंबरनाथ नगर परिषदेमध्ये शहरातील पाच मुख्य रस्त्यांसाठी एमएमआरडीएने ५५ कोटींची आर्थिक तरतूद केली होती. त्यातील पाच कोटींची तरतूद ही अंबरनाथ पश्चिम भागातील बेथल चर्च ते फुलेनगर रस्त्यासाठी करण्यात आली होती. या रस्त्याचे काम गेल्या वर्षी सुरू करण्यात येणार होते. हे काम रखडल्याने पूर्ण रस्ता होण्यास विलंब झाला आहे. त्यातच, या रस्त्याआड अनेक निवासी घरेही येत असल्याने त्यांना हटवणे पालिकेला त्रासदायक होत होते.

विकास आराखड्यात हा रस्ता १८ मीटर ठेवण्यात आला आहे. त्यानुसार, संपूर्ण रस्त्यावर पालिकेने मार्किंगही केले होते. या मार्किंगमध्ये पालिकेने मंजुरी दिलेल्या इमारतींचाही भाग जात होता. त्यामुळे या मार्किंगला सहा मालमत्ताधारकांनी तीव्र विरोध केला. त्या रस्त्याच्या रुंदीकरणाविरोधात उच्च न्यायालयात दाद मागण्यात आली आहे. रस्त्याचे काम सुरू असताना न्यायालयीन बाब पुढे येत असल्याचे लक्षात आल्याने आता पालिकेने रस्त्याचे काम उरकण्याच्या दृष्टीने कार्यवाही सुरू केली आहे.

एमएमआरडीएच्या तंबीनंतर काम रुळांवर

गेल्या वर्षभरापासून या रस्त्याच्या रुंदीकरणाचा घोळ सुरू होता. त्यातच, एमएमआरडीएने ३१ जानेवारीपर्यंत पालिकेने रस्त्याच्या मार्किंगनुसार नकाशा न दिल्यास काम थांबवण्याचा इशारा दिला होता. अखेर, एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांच्या तंबीला घाबरून पालिकेच्या अधिकाऱ्यांनी १२ मीटर रस्त्याचा नकाशा मंजूर करून त्यानुसार रस्त्याचे काम सुरू केले आहे. पालिकेच्या अधिकाऱ्यांनी वेळीच दक्षता घेतल्याने न होणारे काम किमान रुळांवर आले आहे. १८ मीटर रस्त्याचा मोह बाजूला ठेवत पालिकेने आता १२ मीटर रस्त्याचे काम उरकण्यास सुरुवात केली आहे.

टॅग्स :ambernathअंबरनाथthaneठाणे