शहरं
Join us  
Trending Stories
1
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
2
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
3
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
4
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती
5
दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?
6
त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?
7
रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा
8
‘कांटा लगा’ फेम शेफालीचा मृत्यू कशामुळे?, प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू
9
आधी कारने उडवले, मग शस्त्राने भोसकले; अमरावतीत पोलिस अधिकाऱ्याचा खून
10
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
11
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
12
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
13
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
14
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
15
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
16
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
17
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
18
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
19
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
20
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार

स्थानिक परिवहन सेवेला बेस्ट, टीएमटीचा टेकू

By admin | Updated: October 16, 2015 01:46 IST

पालिकेने खाजगी व लोकसहभाग तत्त्वावर सुरू केलेली स्थानिक परिवहन सेवा तोकडी पडू लागल्याने त्याला पर्याय म्हणून

राजू काळे, भार्इंदरपालिकेने खाजगी व लोकसहभाग तत्त्वावर सुरू केलेली स्थानिक परिवहन सेवा तोकडी पडू लागल्याने त्याला पर्याय म्हणून नुकत्याच पार पडलेल्या आढावा बैठकीत एसटी, बेस्ट व टीएमटी सेवेचा टेकू घेण्याचे ठरवून त्या-त्या प्रशासनाला साकडे घालण्याचा निर्णय घेण्यात आला. विविध कारणांमुळे पालिका परिवहन सेवेतील आजमितीस केवळ १५ ते १८ बसच रस्त्यावर धावत असून त्यात उत्तनसाठी २, चौककरिता ४, एस्सेल वर्ल्डसाठी १ अशा एकूण ७ बस या महत्त्वाच्या मार्गांवर सुरू ठेवण्यात आल्या आहेत. या तोकड्या सेवेमुळे प्रवाशांना जादा पैसे मोजून पर्यायी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. पालिकेने उर्वरित २०० पैकी १०० बस खरेदीचा प्रस्ताव केंद्राकडे पाठविल्यानंतर केंद्राने दिलेल्या मंजुरीनुसार खरेदी केलेल्या बस पुढील वर्षी सेवेत दाखल होणार आहेत. यादरम्यान तोकड्या पडलेल्या स्थानिक परिवहन सेवेवर चर्चा करण्यासाठी आयुक्त अच्युत हांगे यांनी नुकतीच आढावा बैठक आयोजिली होती. महापौर गीता जैन, उपमहापौर प्रवीण पाटील, स्थायी सभापती, सभागृह नेता रोहिदास पाटील, सर्वपक्षीय गटनेते यांनी नवीन बससेवेत दाखल होईपर्यंत एसटी, बेस्ट व टीएमटी परिवहन सेवेचा आधार घेण्याची सूचना प्रशासनाला केली आहे. त्यानुसार, प्रशासनाने पर्यायी सेवांचा शोध घेण्यास सुरुवात केल्याचे परिवहन विभाग प्रमुख कल्पिता पिंपळे-वडे यांनी सांगितले.