शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

लाभार्थी १७५; नावे ८५

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2018 01:14 IST

महापालिकेत २५ वर्षे सेवा झालेले सफाई कर्मचारी तसेच मरण पावलेल्या सफाई कर्मचाऱ्यांचे वारस अनेक वर्ष हक्काच्या घरांपासून वंचित आहेत.

मीरा रोड : महापालिकेत २५ वर्षे सेवा झालेले सफाई कर्मचारी तसेच मरण पावलेल्या सफाई कर्मचाऱ्यांचे वारस अनेक वर्ष हक्काच्या घरांपासून वंचित आहेत. महापालिका प्रशासनानेही १७५ कर्मचारी पात्र असताना केवळ ८५ जणांचीच यादी पाठवण्याचा उपद्व्याप केला आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या कर्मचाºयांसह मीरा- भार्इंदर कामगार सेनेने सामान्य प्रशासन विभाग, उपायुक्तांवर कारवाईची मागणी केली आहे.सरकारने २००८ मध्ये आदेश काढून सफाई कामगारांसाठी मालकी हक्काची घरे उपलब्ध करून देण्याचे आदेश काढले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य आवास योजनेअंतर्गत २५ वर्षे सेवा पूर्ण झालेल्या व सेवेत असताना मृत्यू झालेल्या कर्मचाºयांच्या वारसांना या योजनेअंतर्गत मोफत घरे द्यायची आहेत.कामगार संघटनेने सातत्याने केलेल्या पाठपुराव्या नंतर १५ आॅगस्ट २०१५ मध्ये तत्कालिन महापौर गीता जैन यांच्या हस्ते पालिकेतील ६८ कर्मचारी वा त्यांच्या वारसांना मीरा रोडच्या पूनम कॉम्पलेक्स भागात मालकीच्या सदनिका दिल्या. परंतु त्या नंतर उर्वरित कर्मचाºयांना सदनिका देण्याची कार्यवाहीच प्रस्तावित केली नाही. त्यामुळे अशा पात्र कर्मचारी वा त्यांच्या वारसांना सदनिका देण्याची मागणी सातत्याने मीरा- भार्इंदर कामगार सेनेने लावून धरली आहे.या प्रकरणी अतिरीक्त आयुक्त माधव कुसेकर यांच्याकडे झालेल्या २ जूनच्या सुनावणीच्यावेळीही ठाण्याच्या समाजकल्याण विभागाकडे पात्र सफाई कर्मचाºयांच्या घरांचा प्रस्ताव पाठवला जात नसल्याचा मुद्दा मांडण्यात आला होता. त्यावेळीही १५० पात्र कर्मचारी वा त्यांचे वारस असल्याचे कामगार सेनेच्या पदाधिकाºयांनी निदर्शनास आणून दिले होते. त्यावेळी स्वत: उपायुक्त मुख्यालय विजयकुमार म्हसाळ हे उपस्थित होते.अतिरीक्त आयुक्तांकडे झालेली बैठक त्यातच पालिकेचे हे पात्र कर्मचारी वा त्यांचे वारस हक्काच्या घरापासून वंचित असताना संबंधित पालिका अधिकाºयांनी मात्र १८ जून रोजी समाजकल्याण विभागाला फक्त ६५ पात्र कर्मचारी व २० मृत कर्मचाºयांच्या वारसांची मिळून ८५ नावांचीच यादी पाठवली.या प्रकाराने कर्मचाºयांमध्ये संताप व्यक्त होत असून कामगार सेनेनेही आयुक्त बालाजी खतगावकर यांच्या कडे तक्रार केली आहे. तक्रारी सोबत संघटनेने पात्र असलेल्या १३३ कर्मचारी व ४२ मृत कर्मचाºयांची यादीच सोबत जोडून दिली आहे.२ जूनच्या बैठकीत याबाबत चर्चा होवून सर्व काही स्पष्ट असतानाही ते धाब्यावर बसवत उपायुक्त विजयकुमार म्हसाळ व सामान्य प्रशासन विभागातील संबंधित अधिकाºयांनी फक्त ८५ जणांचीच यादी पाठवली आहे. समाजकल्याण विभागास वंचीत ठेवलेल्या कर्मचारयांची चुकीचा प्रस्ताव तयार करणारे व त्यावर स्वाक्षºया करणाºयांवर कारवाईची मागणीही तक्रारीत केली आहे. म्हसाळ यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता होऊ शकला नाही.