शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेच्या वतीने डायघर मधील विविध विकास कामांचा झाला शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2018 15:54 IST

मागील कित्येक वर्षे विकासापासून लांब असलेल्या डायघर आणि आजूबाजूच्या गावांच्या विकासाचा नारळ अखेर वाढविला गेला आहे. येथील विविध विकास कामांना नुकतीच सुरवात झाली आहे.

ठळक मुद्देरस्त्यांचे डांबरीकरण झाले सुरुस्मशानभुमीची सुधारणा

ठाणे - डायघर भागातील विविध विकास कामांचे प्रस्ताव आता टप्याटप्याने मार्गी लागण्यास सुरवात झाली आहे. रविवारी ठाणे महानगरपालिकेच्यावतीने डायघर तसेच परिसरातील गावांकरिता ठाणे महापालिकाआयुक्त संजीव जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली बनविण्यात आलेल्या एकात्मिक विकास प्रकल्पातंर्गत विविध विकास कामांना सुरूवात करण्यात आली. यामध्ये रस्त्यांचे डांबरीकरण करणे आदींसह इतर कामांचा त्यात समावेश आहे.                ठाणे महानगरपालिका हद्दीत दिवा प्रभाग समिती अंतर्गत बहुतांश भाग हा ग्रामीण स्वरु पाचा आहे. या भागाची भौगोलिक परिस्थिती विचारात घेता या परिसराच्या विकास कामांसाठी सुक्ष्म नियोजनाची गरज होती. यासंदर्भात स्थानिक खासदार, आमदार, नगरसेवक तसेच स्थानिक नागरिक यांनी वेळोवेळी सुचना केल्या होत्या. त्यानुसार महापालिका आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली डायघर व आजुबाजुच्या गावांमध्ये मुलभुत सोयीसुविधा उपलब्ध करण्याच्या उद्देशाने एक विशेष एकात्मिक विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. या एकात्मिक विकास प्रकल्प अंतर्गत विविध विकास कामाचा शुभारंभ करण्यात आला. यामध्ये दिवा प्रभाग समितीमधील डायघर रस्त्याचे कल्याण फाटा ते काशिनाथ चौकापर्यंत डांबरीकरण पध्दतीने पुनर्बांधणी व पुनर्पृष्टीकरण करणे, डायघर व खिडकाळी येथील स्मशानभुमीची सुधारणा आणि आधुनिकीकरण तसेच रस्त्याचे काम करणे आदी कामांचा त्यात समावेश आहे. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाcommissionerआयुक्त