शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

मार्चची सुरुवातच 40 अंश सेल्सिअसने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 00:54 IST

उन्हाळ्याने झाले हैराण : क्षुधाशांतीकरिता थंड पेयांकडे पुन्हा वळले

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे  : ठाण्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असताना मागील काही दिवसांपासून ठाण्यात उन्हाचा पाराही वाढू लागला आहे. गेल्या काही दिवसांतील शहराचे दिवसाचे तापमान ३८ ते ४० अंश सेल्सिअसपर्यंत  गेल्याचे दिसून आले आहे. गुरुवारी दुपारी २.३० च्या सुमारास ठाण्याचा पारा ४० अंश सेल्सिअसवर गेल्याने ठाणेकरांच्या अंगाची लाहीलाही होत होती व घामाच्या धारा वाहत होत्या. त्यामुळे अनेकांनी थंड पाण्याबरोबर शीतपेय पिण्याकडे आपला मोर्चा वळवला आहे.मार्च महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात तापमानाचा पारा ४० अंशाच्या पुढे गेल्याने ठाण्याचा विदर्भ झाला का, असा भास होऊ लागला आहे. ठाण्यात फेब्रुवारी अखेरपासून कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे ठाणे महापालिकेची यंत्रणा सतर्क झाली आहे. रोजच्या रोज शहरात १५० ते २०० नवे रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे ठाणेकर सुरक्षेच्या दृष्टीने घरात राहणे पसंत करीत आहेत. दुसरीकडे ठाण्याचा पारा वाढल्याने काही ठाणेकर नागरिक घरात गरम होत असल्याने हवा खाण्यासाठी घराबाहेर पडू लागले आहेत. ठाण्यात एप्रिल महिन्याच्या अखेरीस व मे महिन्यात पारा भलताच वाढताना दिसतो. यंदा मार्च महिना सुरू होताच ठाण्याचा पारा ४० अंशाच्या पार जाऊ लागल्याने एप्रिल, मे आणि अर्धा जून या महिन्यांत ठाण्यात काय अवस्था होईल, याची कल्पनाही न केलेली बरे, असे ठाणेकर बोलत आहेत. ठाण्याचा पारा आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे. यंदा फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीलाच शहरातील तापमान ३५ अंशाच्या आसपास होते. फेब्रुवारी महिना संपेपर्यंत तापमानाने ३८ अंशांचा पल्ला पार केला होता. हीच परिस्थिती मार्च महिन्यात कायम आहे. यंदाच्या वर्षी उष्म्यात वाढ होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. तो खरा ठरला आहे. सकाळपासूनच उष्मा जाणवत होता. दुपारी त्यात आणखी वाढ झाली. त्यामुळे उसाचा रस, ज्युस, कोल्ड्रिंक यांच्या मागणीत वाढ झाली. अनेक जण हॉटेल, टपऱ्या येथे जमून थंडगार पेयांचा आस्वाद घेताना दिसत होते. 

कोरोनाच्या भीतीमुळे काहींनी थंड पाणी पिणे, थंड पदार्थ खाणे सोडले आहे. परंतु जर उन्हाळा असाच वाढत राहिला तर कोरडा पडलेला घसा थंड करण्याकरिता शीतपेयांखेरीज पर्याय असणार नाही. 

टॅग्स :Heat Strokeउष्माघात