शहरं
Join us  
Trending Stories
1
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
3
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
4
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
5
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
6
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
7
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
8
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
9
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
10
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
11
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
12
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
13
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
14
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
15
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
16
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
17
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
18
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
19
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
20
ए. आर. रहमान यांच्या लाइव्ह कॉन्सर्टमुळे नेरूळकरांची कोंडी

बेकायदा बांधकामे नियमित करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2019 01:15 IST

राज्य शासनाने उल्हासनगरसाठी विशेष अध्यादेश काढून बेकायदा बांधकामे नियमित करण्याचा मार्ग मोकळा केला आहे.

उल्हासनगर : राज्य शासनाने उल्हासनगरसाठी विशेष अध्यादेश काढून बेकायदा बांधकामे नियमित करण्याचा मार्ग मोकळा केला आहे. त्याच्या अंमलबजावणीचे सर्वाधिकार उल्हानगर महापालिका आयुक्तांना देण्यात आले आहेत. त्यानुसार बेकायदा बांधकामे नियमित करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली असून नागरिकांकडून प्रस्ताव मागवण्यात आले असल्याची माहिती आयुक्त सुधाकर देशमुख यांनी बुधवारी दिली. यासाठी तज्ज्ञ समितीची स्थापना करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.उल्हासनगरात ८५५ बांधकामांचा प्रश्न ऐरणीवर आल्यानंतर २००६ मध्ये राज्य शासनाने विस्थापिताचे शहर म्हणून खास उल्हासनगरसाठी अध्यादेश काढला. काही अटी-शर्तीनुसार बेकायदा बांधकामे नियमित करण्यासाठी महापालिकेने सरसकट सर्वच बांधकामांना नोटिसा पाठवून बांधकाम नियमित करण्यासाठी आवाहन केले.त्यासाठी प्रभाग समितीनिहाय तज्ज्ञ समिती स्थापन केली. तर प्रस्ताव मंजूर करण्याचे सर्वाधिकार जिल्हाधिकारी यांना दिले होते. तब्बल २२ हजारांपेक्षा जास्त प्रस्ताव तज्ज्ञ समितीकडे आली. त्यापैकी सहा हजार २२६ प्रस्तावांची छाननी करण्यात आली.प्रत्यक्षात १०० बांधकामे नियमित होऊ न त्यांना डी फॉर्म देण्यात आला. तसेच जिल्हाधिकाऱ्यांनी छाननी केलेल्या प्रस्तावांवर सही करण्यास नकार दिल्याने अध्यादेशाचे काम २००९ पासून ठप्प पडले.शहरातील धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आल्यानंतर राजकीय नेत्यांनी राज्य शासनाकडे पाठपुरावा सुरू केला. तसेच शासन अध्यादेशात बदल करण्याचा पाठपुरावा उल्हासनगर संघर्ष समितीने अनेक वर्षांपासून सुरू ठेवला.संघर्ष समितीमध्ये निवृत्त अधिकारी एस. एस. ससाणे, आय. एम. मोरे, सामाजिक कार्यकर्ते सुभाष भानुशाली आणि वास्तुविशारद अतुल देशमुख यांचा समावेश होता.अखेर राज्य शासनाने सुरुवातीला धोकादायक इमारती नियमित करण्याचा निर्णय घेऊ न त्यांच्या पुनर्बांधणीसाठी चार चटईक्षेत्र देण्याला मंजुरी दिली. तसेच, जिल्हाधिकारीऐवजी महापालिका आयुक्तांना प्रस्तावाला अंतिम मंजुरी देण्याचा सर्वाधिकार दिला आहे.>संयुक्त पत्रकार परिषदेत दिली माहितीआयुक्त सुधाकर देशमुख, प्रांत अधिकारी जगजतसिंग गिरासे, आमदार ज्योती कालानी, महापौर पंचम कालानी, स्थायी समिती सभापती राजेश वधारिया यांनी महापौर कार्यालयात संयुक्त पत्रकार परिषद घेऊ न अध्यादेशाचे काम सुरू झाल्याची माहिती दिली. तसेच नागरिकांनी आॅनलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारण्यात येणार आहे. याआधी अर्ज केलेल्यांनीही पुन्हा अर्ज करावे, असे आयुक्त देशमुख यांनी सांगितले.