शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

सुसंस्कृत बदलापूरचा बीअर हब करण्याचा घाट

By admin | Updated: July 3, 2017 06:09 IST

बदलापूर, वांगणी परिसरात पावसाळ््यात धबधब्यांच्याखाली भिजण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने येतात. हा आनंद अधिक द्विगुणीत

बदलापूर, वांगणी परिसरात पावसाळ््यात धबधब्यांच्याखाली भिजण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने येतात. हा आनंद अधिक द्विगुणीत करण्यासाठी त्यांचे पावले ढाब्यांकडे वळतात. तेथे आता उघडउघड दारूचे प्याले रिचवायला मिळत असल्याने पर्यटकांसाठी ती पर्वणीच बनली आहे. त्यामुळे सुसंस्कृत बदलापूरमध्ये भविष्यात बारची संख्या वाढत दारूचा महापूर वाहू लागल्यास आश्चर्य वाटायला नको. कटई नाका ते कर्जत या रस्त्याचा महामार्गात समावेश करण्यात आला होता. मात्र बारबंदीनंतर बदलापूरमधील रस्ते पालिकेच्या ताब्यात घेण्यासाठी घाई सुरू झाली आहे. जो रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ताब्यात होता तो पालिकेच्या ताब्यात देऊन या रस्त्यावरील बारना जीवदान देण्याचे काम करण्यात आले आहे. काटई नाका ते कर्जत या रस्त्यामध्ये केवळ बदलापूरचा तुकडा राज्य महामार्गातून वगळून नवा इतिहास रचला जात आहे. त्यामुळे पुढील काळात बदलापूरमध्ये कोणत्याही रस्त्यावर कितीही मोठा बार उभारून शहरात मद्यसंस्कृती रूजवता येईल. बदलापूर शहरात बारबंदी उठलेली असली तरी बदलापूरची हद्द संपल्यावर पुन्हा ढाबे चालकांचीच चलती आहे. या ठिकाणी दारू पिण्याची मुभा देण्यात येते. बदलापूर ते शेलू या मार्गावर अनेक ढाबे आहेत. त्या ढाब्यांवर दारूची थेट विक्री होत नसली, तरी तेथे बाहेरुन दारू आणून पिण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यात सर्वात पहिला क्रमांक लागतो तो रिलॅक्स फॅमिली गार्डनचा. या ठिकाणी जेवणासोबत दारू पिण्याची सोय उपलब्ध आहे. त्याच्याच पुढे असलेल्या चंदेरी या प्रसिध्द ढाब्यावरही दारू पिण्यासाठी ग्राहकांची गर्दी होत आहे. या ढाब्यातील जेवण हे बदलापूर परिसरात प्रसिध्द असल्याने तळीराम हमखास येथे वळतात. या सोबत स्वामी धाबा हा देखील जेवणासोबत दारू पिणाऱ्यांसाठी प्रसिध्द झाला आहे. हे हॉटेल महामार्गावर असूनही त्या ठिकाणी दारू पिणाऱ्यांची संख्या जास्त दिसत आहे. या सर्व ढाब्यांवर सर्वाधिक गर्दी असते ती शनिवारी रात्री आणि रविवारी दिवसभर. या परिसरातील धबधब्यांच्या ठिकाणी फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकांचीच सर्वाधिक गर्दी या ढाब्यांवर होत असते. अर्थात या ठिकाणी देखील पोलिसांचे संरक्षण असल्यानेच हे सर्व सुरू आहे. वांगणी गावातदेखील ढाब्यांची संख्या कमी नाही. वांगणीत लहान ढाबे आणि चायनीज कॉर्नरवर दारू पिण्यासाठी असंख्य ग्राहक येतात. त्यातल्यात्यात वांगणीतील आदित्य ढाबा हा मात्र दारू पिणाऱ्यांसाठी प्रसिध्द झाला आहे. राज्य महामार्गाला लागूनच हा ढाबा आहे. बारमालकांसाठी रस्ता घेतला ताब्यातबदलापूरमधून जाणारा राज्य महामार्ग राज्य सरकारने पालिकेच्या ठरावाला अधीन राहून पालिकेच्या ताब्यात दिला आहे. सरासरी चार किलोमीटरचा हा रस्ता पालिकेच्या ताब्यात आल्याने त्याच्या देखभाल, दुरूस्तीचा खर्च हा पालिकेला उचलावा लागणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित असलेला राज्य महामार्र्ग पालिकेने ताब्यात घेण्याची कोणतीही गरज नसताना तो रस्ता पालिकेने बारसाठी ताब्यात घेतला आहे. त्याचा फायदा हा पालिकेला कमी तर बारमालकांना जास्त होणार आहे. या रस्त्यावरील बार आणि वाईन शॉप सुरू ठेवण्यासाठी हा रस्ता पालिकेने ताब्यात घेतला आहे. रस्ता ताब्यात घेण्यासाठी पालिकेच्या ठरावाची गरज होती. मात्र तसा ठराव या सहा महिन्यात तरी कधीच झालेला नाही. असे असताना पालिकेने कोणत्या ठरावाच्या अधीन राहून हा रस्ता ताब्यात घेतला हा संशोधनाचा विषय ठरला आहे. कात्रप रस्त्याला महामार्गाचा दर्जा मिळणे गरजेचेबदलापूरमधून जाणाऱ्या दोन प्रमुख मार्गांपैकी एक मार्ग म्हणजे कात्रप रोड. कात्रप परिसरातून जाणारा रस्ता हा जिल्हा मार्ग दाखविण्यात आला आहे. मूळात या रस्त्याचे काम करताना तो रस्ता राज्य महामार्ग असल्याचे भासवत निधी मिळवण्यात आला होता. त्यामुळेच या रस्त्याचे चौपदरीकरण करून रस्ता काँक्रिटचा करण्यात आला. त्यामुळे बेलवलीतील राज्य महामार्र्ग पालिकेने ताब्यात घेऊन बारमालकांना संरक्षण दिले असले तरी किमान कात्रप येथून जाणारा रस्ता हा राज्य महामार्गात वर्ग करण्याची गरज आता व्यक्त होत आहे. मात्र या रस्त्यावर देखील मोठ्या प्रमाणात बार असल्याने या रस्त्यासंदर्भात देखील ठोस निर्णय घेतले जात नसल्याचे समोर येत आहे.