शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

गरीब-गरजूंसाठी ‘ब्युटीफुल’ संकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2018 02:15 IST

घरकामगार महिलांच्या मुलींनीही घरकामच न करता त्यांनीही मेहंदी, ब्युटीपार्लर, शिवणक्लास अशा व्यवसायाच्या विविध वाटा निवडाव्या, या उद्देशाने त्यांना मार्गदर्शन करण्याचा आणि हे विविध कोर्स विनामूल्य शिकवण्याचा संकल्प केला आहे, तो प्रियंका तलांडे, निशंका ढाले आणि प्रियंका सुर्वे या तीन सर्वसामान्य कुटुंबातील ठाणेकर तरुणींनी.

स्नेहा पावसकरठाणे : घरकामगार महिलांच्या मुलींनीही घरकामच न करता त्यांनीही मेहंदी, ब्युटीपार्लर, शिवणक्लास अशा व्यवसायाच्या विविध वाटा निवडाव्या, या उद्देशाने त्यांना मार्गदर्शन करण्याचा आणि हे विविध कोर्स विनामूल्य शिकवण्याचा संकल्प केला आहे, तो प्रियंका तलांडे, निशंका ढाले आणि प्रियंका सुर्वे या तीन सर्वसामान्य कुटुंबातील ठाणेकर तरुणींनी.आपली आई घरकाम करते आणि पुढे जाऊन तिच्याप्रमाणेच आपणही नकळतपणे या घरकामात अडकले जाऊ नये, या उद्देशाने निशंका हिने त्याकाळी ब्युटीपार्लरचा कोर्स केला. पार्लरमध्ये नोकरी केल्यावर कालांतराने तिने स्वत:चा व्यवसाय सुरू केला. मात्र, इतरही घरकामगार महिलांच्या तसेच गरीब-गरजू मुलींच्या वाट्यालाही घरकामच येऊ नये आणि यासाठी आपण समाजाप्रति काही योगदान देण्याचे निशंका हिने निश्चित केले. तिने प्रियंका सुर्वे आणि प्रियंका तलांडे या आपल्या दोन मैत्रिणींना ही कल्पना सांगितली आणि त्या दोघीही तिच्या कामात आनंदाने सहभागी झाल्या. या तिघींनी कलाकौशल्य फाउंडेशनच्या माध्यमातून झोपडपट्टी परिसरातील महिलांना ब्युटीपार्लरचा बेसिक तसेच अ‍ॅडव्हान्स कोर्स मोफत शिकवण्याचे ठरवले. साधारण आॅक्टोबर २०१७ पासून त्यांनी या कोर्सचे प्रशिक्षण देणे सुरू केले. या तिघींनी आतापर्यंत ठाण्यातील समतानगर, किंगकाँगनगर, तुर्फापाडा येथील सुमारे ४० जणींना प्रशिक्षण दिले आहे. त्यात्या प्रभागातील इच्छुक महिलांचे १० जणींचे गट करून त्यातील एखाद्या महिलेच्या घरी त्या प्रशिक्षण देतात. आठवड्यातून साधारण तीन वेळा याप्रमाणे त्या तीन महिने प्रशिक्षण देतात. प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांना फाउंडेशनतर्फे प्रशस्तीपत्रकही दिले जाते. सुमारे १४ वर्षांपासून ते ३५ वर्षांपर्यंतच्या महिला सहभागी झाल्या होत्या. येत्या काळात महिलांच्या प्रतिसादानुसार ठाण्यातील इतरही चाळवस्तींमध्ये आपण कोर्सचे प्रशिक्षण देणार असल्याचे निशंका यांनी सांगितले. आमच्याकडे असलेली कला आणि त्याचे प्रशिक्षण आम्ही गरीब घरांतील मुली-महिलांना देऊ शकत आहोत, याचा आम्हाला आनंद असून त्यातून त्या स्वावलंबी बनाव्यात, हीच आमची इच्छा असल्याचे प्रियंका यांनी सांगितले.