शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

लोखंडी रॉडने मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:45 IST

---------------------------------------- दांडक्याने मारहाण डोंबिवली : पूर्वेतील शेलार चौक, त्रिमूर्तीनगर वाल्मिकी वस्ती येथे राहणारा आकाश झिझोटड (२३) हा गुरुवारी रात्री ...

----------------------------------------

दांडक्याने मारहाण

डोंबिवली : पूर्वेतील शेलार चौक, त्रिमूर्तीनगर वाल्मिकी वस्ती येथे राहणारा आकाश झिझोटड (२३) हा गुरुवारी रात्री ९ वाजता वाशी, कोपरखैरणे येथून दुचाकीने घरी परतत होता. कोळेगाव-बदलापूर या मार्गावर लघुशंकेसाठी थांबला असता एका कारमधून चार व्यक्ती उतरल्या आणि त्यांनी त्याला ‘तू इथे लघुशंका का करतो, तुझ्या बापाची जागा आहे का?’ असे बोलून दांडक्याने मारहाण केली. याप्रकरणी मानपाडा पोलिसात आकाशच्या तक्रारीवरून चौघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

---------------------

दुचाकीची चोरी

डोंबिवली : शहरात वाहनचोरीचे सत्र सुरूच आहे. सूरज बिराजदार यांनी त्यांची दुचाकी रविवारी सकाळी ११.४५ ते सायंकाळी ६ च्या कालावधीत पूर्वेतील चित्तरंजनदास रोडवर पार्क केली होती. तेथून ती गाडी चोरीला गेली आहे. याप्रकरणी सूरज यांनी रामनगर पोलिसात तक्रार दिली असून गुन्हा नोंद झाला आहे.

-------------------------------------------

घरफोडीत चांदीचे दागिने लंपास

कल्याण : पूर्वेतील चिंचपाडा रोडवरील संपदा अपार्टमेंटमध्ये राहणारे सचिन कोकणे यांच्या वडिलांचे वर्षश्राद्ध असल्याने ते कुटुंबासह ६ ते ८ जुलै दरम्यान नाशिक येथील त्यांच्या गावी गेले होते. यावेळी त्यांचे कल्याणमधील बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरातील ३७ हजार ७०० रुपयांचा चांदीचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी कोळसेवाडी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

-----------------------

भाजीविक्रेत्या महिलेला लुटले

डोंबिवली : आरती जगदाळे या रविवारी सकाळी १० वाजता आजदेपाडा येथून सागर्लीकडे जाणाऱ्या रोडलगतच्या साध्वी अपार्टमेंटमध्ये गाळ्यासमोर हातगाडीवर भाजीपाला विकत होत्या. त्यावेळी तेथे आलेल्या दोघा अनोळखी व्यक्तींनी संगनमत करून आरती यांच्या गळ्यातील ३० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र आणि अंगठी घेऊन पोबारा केला. याप्रकरणी मानपाडा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

-----------------------

भरवस्तीत चोरी

कल्याण : पश्चिमेकडील टिळक चौक, लेले वाडा परिसरातील दुकानाच्या पाठीमागील भिंतीस भोक पाडून चोरट्यांनी ४१ हजारांचा सोन्याचा ऐवज चोरून नेला. ही घटना शुक्रवार ते सोमवार या कालावधीत घडली. याप्रकरणी दुकानमालक समीर अमृते यांनी बाजारपेठ पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा नोंद झाला आहे.

-----------