शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

इंटेरिअर डेकोरेटरला मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:42 IST

-------------------------------------------- डोक्यावर प्रहार कल्याण : मुलाला मारहाण करत असल्याने त्याला सोडविण्यासाठी गेलेल्या श्रवण सिंग यांना अशोक बेनीवाल यांनी शिवीगाळ ...

--------------------------------------------

डोक्यावर प्रहार

कल्याण : मुलाला मारहाण करत असल्याने त्याला सोडविण्यासाठी गेलेल्या श्रवण सिंग यांना अशोक बेनीवाल यांनी शिवीगाळ करून भिंतीवर ढकलून दिले. तसेच त्यांच्या डोक्यावर प्रहार करून जखमी केले. याप्रकरणी सिंग यांनी दिलेल्या तक्रारीवरून कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. हा प्रकार कैलासनगर येथे सोमवारी रात्री साडेअकराच्या सुमारास घडला.

-----------------------------------

कारचे टायर चोरीला

डोंबिवली : प्रशांत चव्हाण यांनी शनिवार ते सोमवार या कालावधीत जिमखाना सागर्ली रोडवर एस.टी.डेपोच्या बाजूला कार पार्क केली होती. तिचे पुढील दोन टायर चोरीला गेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी चव्हाण यांनी टिळकनगर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा नोंद झाला आहे.

------------------------------------

मारहाण

डोंबिवली : अक्षय कवडे हा तरुण सोमवारी आडिवली तलावाजवळ सुरू असलेल्या बांधकामाच्या ठिकाणी गेला असता त्याला मनीष चौहान आणि अन्य तिघांनी लाकडी बांबूने मारहाण केल्याची घटना घडली. याप्रकरणी अक्षयने मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. मारहाणीचे कारण समजू शकलेले नाही.

----------------------------------------

पथदिवे केव्हा लागणार

डोंबिवली : येथील पूर्वेकडील छेडा रोडवर जुन्या पथदिव्यांच्या ठिकाणी नवीन पथदिवे बसविले जात आहेत. परंतु, हे काम संथगतीने सुरू असल्याने या रस्त्यावर रात्री अंधाराचे साम्राज्य असते. पथदिव्यांसाठी चौथरेदेखील बांधून झाले आहेत. मात्र, पुढील कार्यवाही पूर्णपणे ठप्प आहे. त्यामुळे जलदगतीने हे काम पूर्ण करून पथदिव्यांची सुविधा द्यावी, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.

-------------------------------------------------------------