शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

मराठी भाषा, शाळांसाठी स्वयंसेवक व्हा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2018 05:31 IST

साहित्य महामंडळाची हाक : नुसते धोरण काय कामाचे? मराठीचा विलय मान्य आहे का?

जान्हवी मोर्ये ।डोंबिवली : महाराष्ट्राची उपराजधानी असलेल्या नागपूरमध्ये ८१ पैकी ३४ मराठी माध्यमाच्या शाळा बंद पडल्याचे शपथपत्रच नागपूर महापालिकेने उच्च न्यायालयात सादर केले आहे. ही विदारक स्थिती केवळ नागपूरची स्थिती नाही. राज्यातील अन्य शहरांतही तशीच परिस्थिती असल्याने मराठी भाषा वाचवण्यासाठी केवळ धोरण जाहीर करून भागणार नाही, त्यासाठी भाषा वाचविणारा स्वयंसेवक व्हावे लागेल, अशी हाक अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी यांनी दिली आहे.मराठी शाळा वाचवण्यासाठी आपणच जर प्रयत्न करणार नसू, तर मराठी भाषेचा विलय आपल्याला मान्य आहे, असाच त्याचा अर्थ काढावा लागेल, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली.प्राथमिक शिक्षण मातृभाषेतून देणे गरजेचे असतानाही नागपूरमध्ये ४० टक्के मराठी शाळा बंद झाल्याचे प्रमाणित करण्याची वेळ नागपूर महापालिकेवर न्यायालयात आली. मराठी वाचविण्यासाठी शहर, तेथील प्रशासन आणि राज्य सरकार किती उदासीन आहे, याचेच हे द्योतक आहे. एका जागरुक नागरिकाने दाखल केलेल्या जनहित याचिकेमुले ही वस्तुस्थिती उघड झाली.गेल्या पाच वर्षांत मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांची संख्या कमी झाल्याने शाळा बंद करण्याची वेळ आल्याचे प्रतित्रापत्रात म्हटले आहे. त्यावर न्यायालयाने मराठी शाळांमध्ये नाव दाखल करण्यास उत्सुक असलेल्या पालकांचे संमतीपत्र सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. आता न्यायालयाला उन्हाळी सुट्टी लागेल. त्यामुळे याचिकेवर पुढील सुनावणी त्यानंतर होईल. तोवर नवे शैक्षणिक वर्ष सुरू होईल. पण या स्थितीतही आपण भाषा व साहित्यप्रेमी म्हणवणारे, भाषा व साहित्याच्या नावे विविध प्रकारच्या संस्था चालवणारे, मराठी विषयाचे शिक्षक, प्राध्यापक , त्यांच्या संघटना तसेच सर्व भाषक नेमके काय करणार, हा महत्त्वाचा प्रश्न आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे.आपल्यातले किती लोक, किती पालक शासनाकडे बोट न दाखवता शाळा जगवण्यासाठीची गरज भागवण्यासाठी पुढे येतील, असा प्रश्न त्यांनी पत्रकात उपस्थित केला आहे. ज्या पालकांची मुलांना मराठी शाळेत शिकवण्याची तयारी आहे, अशांची जास्तीत जास्त संमतीपत्रे भरून घेण्यासाठी भाषेचे स्वयंसेवक व्हायला कितीजण तयार आहेत, हा सध्या खरा प्रश्न आहे. केवळ धोरणात्मक घोषणा करून सुटणारा हा मुद्दा नाही. तो सोडवणे हे एखाद्या संस्थेचे किंवा एकट्यादुकट्या व्यक्तीचे काम नाही, याकडे जोशी यांनी लक्ष वेधले आहे. त्यासाठी पुढे येण्याची तयारी दाखवणाऱ्यांची, याबाबत कृती योजना आखून ती प्रत्यक्षात अंमलात आणण्याची तयारी असणाºयांचा शोध घेण्याची गरज आहे.... तर ठोस कार्यक्रम!या आवाहनाला प्रतिसाद दिल्यास तो देणाºयांच्या सभेच्या आयोजनाच्या खर्चाचा विचारही करणे शक्य होईल, असे त्यांनी म्हटले आहे. आपण मराठीचे स्वयंसेवक झाल्यास राज्यभरात हा उपक्रम राबवून मराठी शाळा बंद पडू नयेत, याविषयी ठोस कार्यक्रम आखता येईल, याकडे जोशी यांनी लक्ष वेधले आहे.हे मान्य आहे का?मराठी शाळा वाचवण्यासाठी स्वयंसेवक म्हणून कोणी पुढे न आल्यास मराठीचा हा विलय आपणा मराठी भाषिकांनाच मान्य आहे, असेच समजायचे का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

टॅग्स :marathiमराठी