शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

सावधान ! ठाण्यात आढळला पहिला म्युकरमायकोसिस आजाराचा पहिला रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:42 IST

ठाणे : कोरोनाच्या संकटातून ठाणे जिल्हा सावरत असतानाच म्युकरमायकोसिस या बुरशीजन्य आजाराचा पहिला रुग्ण आढळला असल्याची धक्कादायक माहिती ...

ठाणे : कोरोनाच्या संकटातून ठाणे जिल्हा सावरत असतानाच म्युकरमायकोसिस या बुरशीजन्य आजाराचा पहिला रुग्ण आढळला असल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. कोरोनाची लागण झाल्यानंतर रोगप्रतिकारशक्ती कमी झाल्यामुळे त्याचा थेट परिणाम डोळ्यांवर होत असून, या म्युकरमायकोसिस आजारात रुग्णांचे डोळे निकामी होत आहेत. ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयात कोरोनावर उपचार घेत, असलेल्या एका ५६ वर्षीय महिलेच्या उजव्या डोळ्याची हालचाल होत नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्याची गांभीर्याने दाखल घेत, त्यांच्या काही चाचण्या केल्या. त्या चाचणी अहवालातून त्यांना म्युकरमायकोसिस या आजाराची लागण झाल्याचे स्पष्ट झाले.

ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयात रविवारी रात्री या ५६ वर्षीय महिलेला कोरोनावरील उपचाराकरिता दाखल केले. त्यावेळी त्यांचा उजवा डोळा लाल झाल्याचे दिसून आले. तेथील कर्तव्यावरील डॉक्टरांनी नेत्र विभागाशी संपर्क साधून रुग्णाची तपासणी करण्याचा सल्ला दिला. त्यावेळी जिल्हा नेत्र शल्यचिकित्सक डॉ. शुभांगी अंबाडेकर यांनी त्या महिला रुग्णांची तपासणी केली. त्यावेळी त्या महिलेचे डोळे पुढे आल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले. तसेच त्यांच्या उजव्या डोळ्याची हालचाल होत नव्हती. तसेच प्रकाश दाखवल्यानंतरही त्यांच्या डोळ्यातील बाहुलीची कोणतीच हालचाल होत नव्हती. त्यानंतर त्यांचे सिटीस्कॅन, ओर्बिट ब्रेन सिटी स्कॅन करण्यात आले. त्यावेळी त्यांच्या उजव्या डोळ्याच्या मास पेशींना सूज असल्याचे दिसून आले. तर, सायनसमध्येदेखील सूज असल्याचे स्पष्ट झाले. त्या महिलेला म्युकरमायकोसिस हा आजार झाल्याच्या निर्णयाप्रत डॉक्टर आले आहेत. जिल्ह्यातील या आजाराची बहुतेक ही पहिली रुग्ण आहे. जिल्ह्यातील खासगी नेत्रतज्ज्ञांकडे आणखी कुणी रुग्ण म्युकरमायकोसिसवर यापूर्वीच उपचार घेत असतील तर त्याची जिल्हा प्रशासनाकडे नोंद नाही.

जिल्ह्यातील शहरी, ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. कोरोना बरा होण्याकरिता बहुतांश रुग्णांना डॉक्टर स्टीरॉइड देत आहेत. मधुमेहाने आजारी असलेल्या रुग्णांना स्टीरॉइड दिले व त्यामुळे त्यांची रक्तशर्करा वाढली त्याचवेळी रुग्णांची रोग प्रतिकारशक्ती खालावली तर अशा रुग्णांमध्ये म्युकरमायकोसिस नावाचा आजार आढळून येतो. रुग्णांच्या डोळ्यांवर या आजारात परिणाम होतो. रुग्णांचे डोळे निकामी होण्याचा धोका असतो. हे प्रमाण वाढण्याची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. या आजाराचे सायनसमधून संक्रमण होते. पुढे ते तोंडाच्या आतून वरचा जबडा, डोळा आणि मेंदूपर्यंत पोहोचते. रुग्णांना वेळीच उपचार मिळाले नाहीत तर पॅरालिसिस आणि मृत्यूही येण्याची शक्यता असते.

हा आजार शरीरात कुठे ही होऊ शकतो

म्युकरमायकोसिस हा काळ्या बुरशीसारखा असतो. तो केवळ डोळ्यांमध्ये नाही तर, मेंदू, हिरड्यांमध्ये तसेच छातीतदेखील होऊ शकतो, अशी माहिती वैद्यकीय सूत्नांनी दिली.

काय आहेत लक्षणे

वरच्या पापणीला सूज, ती खाली येणे, डोळा पुढे आल्यासारखा वाटणे, डोळ्यांभोवतीची त्वचा काळसर होणे, डोळ्यांची हालचाल मंदावणे, दोन वस्तू दिसणे, नाकावर सूज, नाक बुजणे, चेहऱ्यावर एका बाजूने सूज, डोळ्यांमध्ये वेदना ही या आजाराची लक्षणे आहेत.

यांना अधिक धोका

रोगप्रतिकारशक्ती कमी असणाऱ्या, मधुमेह असलेल्यांना धोका अधिक आहे. कोरोना वाढल्यास अँटिव्हायरल आणि स्टेरॉइड द्यावेच लागतात. या औषधांनी रोगप्रतिकारशक्ती कमी होते. अशा रुग्णांमध्ये म्युकरमायकोसिसचा धोका आहे.

.........

एका महिला रुग्णाला म्युकरमायकोसिस या आजाराची लागण झाल्याचे उघड झाले आहे. मात्र, हा आजार स्टेरोईडच्या किंवा अँटिबायोटिकच्या अतिसेवनामुळे झाला असल्याची शक्यता आहे. या आजाराची गांभीर्याने दाखल घेत, त्या रुग्णाला पुढील उपचारासाठी मुंबईतील सायन रुग्णालयात हलविण्यात येणार आहे.

- डॉ. कैलास पवार, जिल्हा शल्यचिकित्सक, ठाणे

........

वाचली