भातसानगर : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीसाठी सुरू असलेल्या संघर्ष यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याचा शेवट १८ एप्रिलला शहापूर तालुक्यात होणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे आमदार पांडुरंग बरोरा यांनी पत्रकरा परिषदेत दिली. यावेळी ज्येष्ठ नेते शरद पवार, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, धनंजय मुंडे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, अजित पवार, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड आदी नेते आणि शंभरपेक्षा जास्त आमदार उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. राज्य सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली तर शहापूर तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांचे २५० कोटींचे कर्ज माफ होईल, असा दावा त्यांनी केला. (वार्ताहर)मुंबई-नाशिक महामार्ग २६ एप्रिलला रोखणारमुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाविरोधात एकत्र येत सर्वपक्षीय नेते २६ एप्रिलला मुंबई - नाशिक महामार्ग रोखणार आहेत, अशी माहिती कुणबी सेनाप्रमुख विश्वनाथ पाटील यांनी दिली. यावेळी जेल भरो आंदोलन करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
संघर्ष यात्रेचा समारोप मंगळवारी शहापुरात
By admin | Updated: April 17, 2017 04:47 IST