शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

पायाभूत चाचणीचे पेपर फुटले? प्रश्नपत्रिकांचा तुटवडा : पुन्हा झेरॉक्स काढण्याची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2017 03:11 IST

महाराष्ट्र विद्या प्राधिकरणाकडून घेण्यात येणा-या पायाभूत चाचणीच्या परीक्षेचे (बेसलाइन टेस्ट) पेपर नेहमीप्रमाणे कमी पडल्याने झेरॉक्स काढताना ते फुटल्याचा आरोप झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.

ठाणे : महाराष्ट्र विद्या प्राधिकरणाकडून घेण्यात येणा-या पायाभूत चाचणीच्या परीक्षेचे (बेसलाइन टेस्ट) पेपर नेहमीप्रमाणे कमी पडल्याने झेरॉक्स काढताना ते फुटल्याचा आरोप झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.पहिल्या दिवशी भाषेचा पेपर होता. यापूर्वीही या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांच्या संख्येपेक्षा कमी पेपर सेंटरला पाठवल्याने झेरॉक्स काढाव्या लागल्याची वेळ आली होती आणि तेव्हाही पेपर फुटल्याचा आरोप झाला होता. पण त्यावर काहीच हालचाल झाली नव्हती.ठाण्यासह कल्याण-डोंबिवली परिसरात प्रश्नपत्रिकांचा तुटवडा होता. त्यामुळे शाळांनी पेपरच्या झेरॉक्स काढून परीक्षा घेतल्याचे शिक्षक सेनेच्या अध्यक्षांनी सांगितले.प्रगत शैक्षणिक महाराष्टÑ कार्यक्रमाद्वारे शालेय शिक्षण विभाग ही चाचणी घेतो. त्यात गुरुवारी पहिला पेपर भाषेचा, शुक्रवारी गणिताचा, सोमवारी इंग्रजी, तर मंगळवारी विज्ञानाचा पेपर होणार आहे. भाषेच्या परीक्षेवेळी ठाणे शहरातील बहुतांशी शाळांत प्रश्नपत्रिका कमी पडल्यामुळे झेरॉक्स काढाव्या लागल्या. गणिताच्या पेपरच्या प्रश्नपत्रिकाही कमी असल्याने त्याच्याही झेरॉक्स काढण्याच्या सूचना शिक्षण विभागाने दिल्याचे शिक्षक सेनेचे ठाणे अध्यक्ष दिलीप डुंबरे यांनी सांगितले. कल्याण व डोंबिवली परिसरातही हीच स्थिती आहे. झेरॉक्सच्या दुकानातून या प्रश्नपत्रिका फुटल्याचे संघटनेचे कल्याण जिल्हाध्यक्ष प्रशांत भांबरे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.बहुतांश शाळांत विद्यार्थी संख्येपेक्षा कमी प्रश्नपत्रिका असल्याने झेरॉक्स काढाव्या लागतात. शिक्षण विभागाकडून त्रास होऊ नये, म्हणून या शाळा नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर तक्रारी करत असल्याचे डुंबरे व भांबरे यांनी सांगितले.पेपरफुटीच्या या आरोपांसंदर्भात ठाणे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकारी मीना शेंडकर यांना उशिरापर्यंत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण तो होऊ शकला नाही.