शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
3
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
4
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
5
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
6
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
7
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
8
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
9
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
10
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
11
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
12
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
13
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
14
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
15
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
16
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
17
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
18
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
19
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
20
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
Daily Top 2Weekly Top 5

आधारची सक्ती ही रस्त्यावरची लढाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2018 01:33 IST

मतदान कार्ड, पासपोर्टवर आपली सही असते. तशी आधारकार्डवर नाही. मग आधारची गरज काय? खाजगी आयुष्याचा अधिकार सर्वांना आहे

ठाणे : मतदान कार्ड, पासपोर्टवर आपली सही असते. तशी आधारकार्डवर नाही. मग आधारची गरज काय? खाजगी आयुष्याचा अधिकार सर्वांना आहे. परंतु, आधारवरील नंबर घेऊन व्यक्तीचे आजार, सवयी, त्याच्या इतर गोष्टींची माहिती काढली जाते. एकंदरीतच टेक्नॉलॉजिने सामाजिक प्रश्न सुटत नाहीत तर उलट माणसांना यंत्र बनविले जात आहे. सर्वोच्च न्यायालय आधार कार्डची बहुदा सक्ती करणार नाही अशी अपेक्षा आहे. परंतु, हा रस्त्यावरच्या लढाईचा विषय असून याविरोधात एकत्र आलेच पाहिजे, असे मत अ‍ॅड.कामायनी बाली यांनी व्यक्त केले.आधार कार्ड योजना सुरक्षित नसल्याचे खुद्द केंद्र सरकारने कबूल केल्यानंतर देशात ब्रेक आधार चेन्स नावाची मोहिम सुरू आहे. याचा एक भाग म्हणून मंगळवारी ठाण्यात मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या सभागृहात आधार कार्ड लिंक तोडा- जागरण व मार्गदर्शन सभा पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी अनिल शालिग्राम होते. यावेळी अ‍ॅड. बाली यांच्यासह बायोमेट्रिक तज्ज्ञ जे.डिसुझाही उपस्थित होते.आधारच्या माध्यमातून व्यक्तीची कोणतीही माहिती खाजगी राहत नाही, ही मुख्य समस्या आहे. ती इलेक्ट्रॉनिक माध्यमातून विविध कंपन्यांना राउटरद्वारे मिळत राहते. त्याची एक फार मोठी चेन तयार होते. ही माहिती विकली जाण्याचीही शक्यता आहे. एक आधार कार्ड काढल्यावर संपूर्ण माहिती जगात जाते. म्हणून आधार हा योग्य पर्याय नाही, असे डिसुझा यांनी सांगितले. तर बोटाचे ठसे, डोळ्यांचे फोटो हेदेखील युनिक नाहीत हे सांगताना डिसुझा यांनी स्पष्टीकरण दिले. डोळ्यांचे फोटो काढून बरोबर मध्यभागी पिनने भोक पाडले व ज्याला ते वापरायचे त्यांनी आपल्या डोळ्यासमोर धरून स्कॅन केले तेव्हा त्याचे डोळे हे ओरिजिनल माणसांसारखे स्कॅन झाले. त्यामुळे डोळ्यांचेही डुप्लिकेट करता येते. आणि असेच डुप्लिकेट वापरून साडेतीन वर्षे गुजरातमध्ये रेशन घोटाळा झाल्याचे डिसुझा यांनी सांगितले.