शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

यंदाच्या पावसाळ्यात बारवीत वाढीव पाणी

By admin | Updated: May 7, 2016 00:43 IST

बारवी धरणाची उंची वाढविण्याचे काम पूर्ण झाले असून फक्त दरवाजे बसविणे शिल्लक आहे. ते काम महिनाअखेरीस सुरू होईल. त्यामुळे यंदाच्या पावसाळ््या बारवी धरणात जादा पाणी

डोंबिवली : बारवी धरणाची उंची वाढविण्याचे काम पूर्ण झाले असून फक्त दरवाजे बसविणे शिल्लक आहे. ते काम महिनाअखेरीस सुरू होईल. त्यामुळे यंदाच्या पावसाळ््या बारवी धरणात जादा पाणी साठविण्यास सुरूवात होईल. त्यामुळे ४० टक्के जादा साठा उपलब्ध होणार असून पुढच्या वर्षी पाणीटंचाईची स्थिती राहणार नाही, अशी माहिती एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता प्रकाश लोणकर यांनी दिली. या वेळी डोंबिवली एमआयडीसीचे प्रमुख अभियंता शंकर जगताप आणि संजीव साळवे उपस्थित होते. डोंबिवली पत्रकार संघाच्यावतीने शुक्रवारी बारवी धरणाची सद्यस्थिती आणि विस्थापितांचे पुनर्वसन यांची पाहणी करण्यासाठी दौरा झाला. तेव्हा पत्रकारांना माहिती देताना लोणकर आणि जगताप यांनी सांगितले, धरणाची उंची तीन मीटरने वाढवली आहे. पाणी साठवल्याने विस्थापित होणाऱ्या काचकोली आणि तोंडली गावातील ४० कुटुंबांसाठी गावठाणात संक्र मण शिबिराची सोय करणार आहे. धरणाची उंची वाढविल्याने सहा गावे आणि पाच पाड्यांमधील १७८ कुटुंबियांचे पुनर्वसन केले जाणार आहे. काहींनी नोकरी आणि जमिनीच्या मूल्यांकनावरून स्थलांतरित होण्यास विरोध केला आहे. या गावांचे सर्वेक्षण २००९ मध्ये केले होते. मात्र आता २०१४ च्या बाजारभावाने घराचे पैसे हवे आहेत. पूर्वी ७६५ कुटुंबीय होते. ती आता ११०५ झाली आहेत. तसेच प्रकल्पग्रस्तांच्या कुटुंबियांना केडीएमसी आणि ठाणे महापालिकेत नोकरीची हमी हवी आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. सध्या बारवी धरणालगत वीजनिर्मिती प्रकल्प सुरु असून त्यातून १.१ मेगावॅट वीज तयार होऊन वॉटर फिल्टर प्लांटसाठी वापरली जाते. (प्रतिनिधी)यंदा जादा पाणीसध्या बारवी धरणात ४३.११ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्यावर्षी याच दिवसापर्यंत ४२.९६ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा होता. पूर्वी बारवी धरणाची उंची ६५.६० इतकी होती. ती आता ६८.६० इतकी झाली आहे. यामुळे धरणात २३२.५० दशलक्ष घनमीटरपर्यंत पाणीसाठा वाढणार आहे. धरणात ११ नवीन वक्र ाकार दरवाजे लावण्याचे काम सुरू असून ते या महिन्याभरात सुरु करण्यात येतील असे जगताप यांनी सांगितले.