शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

बँकेला कोटीचा गंडा घालणारे दोघे गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2018 02:34 IST

खोटी नावे व कागदपत्रांच्या आधारे गृहकर्ज काढून पंजाब नॅशनल व विजया बँकेला एक कोटी १२ लाख रुपयांना गंडा घालणाऱ्या टोळीतील दोघा आरोपींना नवघर पोलिसांनी अटक केली.

मीरा रोड : खोटी नावे व कागदपत्रांच्या आधारे गृहकर्ज काढून पंजाब नॅशनल व विजया बँकेला एक कोटी १२ लाख रुपयांना गंडा घालणाऱ्या टोळीतील दोघा आरोपींना नवघर पोलिसांनी अटक केली. विशेष म्हणजे खोट्या नावाने काढलेल्या आधार ओळखपत्रातील बोटांच्या ठशांमुळे हा घोटाळा उघड झाला.नवघर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील छत्रपती शिवाजी महाराज मार्गावर असलेल्या कॉर्पोरेशन बँकेचे व्यवस्थापक सीताराम प्रसाद यांनी दिलेल्या फिर्यादीनंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला. सत्येन यशवंत पडवळ (४२, रा. सूरज टॉवर, उड्डाणपूल, नयानगर) व निमा भावेश पटेल (४४, रा. न्यू म्हाडा कॉलनी, शांती गार्डन मीरा रोड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. पोलीस आणखी चार आरोपींचा शोध घेत आहेत.सत्येन पडवळ याने सुकेश गोपाळ कंडेरा व संजय शिवाजी सावंत या नावाने बनावट खाती उघडली होती. सुकेशच्या नावाने पंजाब नॅशनल बँकेतून ६४ लाख ६१ हजारांचे गृहकर्ज घेतले. तर निमा पटेल हिने हेमा राजेश कपाडिया व मेहरबानो अन्वर कब्बानी अशा दोन खोट्या नावांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे बँकांमध्ये खाती उघडली होती. तिने हेमाच्या नावाने भांडुपच्या विजया बँकेच्या शाखेतून ४८ लाख रुपयांचे गृहकर्ज काढले. दोन्ही गृहकर्जे बनावट कागदपत्रांच्या आधारावर काढण्यात आली. निमा हिने आपल्या हेमा नावाच्या खात्यातून ४८ लाख रुपये जम्मू काश्मीर बँकेतील मेहरबानो नावाच्या बनावट खात्यात आरटीजीएसने वळते केले. मेहरबानोच्या खात्यातील १५ लाख रुपये सुकेश खंडेरा या नावाच्या खात्यावर टाकले.सत्येन पडवळ जेव्हा निमासोबत सुकेश या नावाच्या खात्यातून १५ लाख रुपये काढण्यासाठी कॉर्पोरेशन बँकेत गेला, तेव्हा रक्कम मोठी असल्याने त्याच्या आधार कार्डला लिंक असलेल्या बोटांचे ठसे बँकेने पडताळणीसाठी घेतले. त्यावेळी खाते सुकेशचे असताना बोटांचे ठसे मात्र संजय सावंत या नावाच्या व्यक्तीचे असल्याचे बँक कर्मचाºयांना आढळून आले. त्यांनी लागलीच याची माहिती नवघर पोलिसांना दिली.पोलीस निरीक्षक राम भालसिंग यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक महेश कुचेकर व सहकाºयांनी तपास करत आरोपी सत्येन उर्फ सुकेश उर्फ संजय व निमा उर्फ हेमा उर्फ मेहरबानो या दोघांना अटक केली.या आरोपींनी न्यू इंडिया को.आॅप. बँक, बॅसिन कॅथलिक बँक, शामराव विठ्ठल सहकारी बँक, जम्मू काश्मिर बँक व कॉर्पोेरेशन बँकेत खोट्या नावांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे खाती उघडल्याचे दिसून आले. त्यासाठी गुमास्ता परवाना, आधारचे ओळखपत्र बनावट कागदपत्रांनी बनवले. मतदार ओळखपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, गृहकर्जासाठी लागणारी कागदपत्रे आदीही बनावट बनवली. पोलिसांनी त्यांच्याकडील पासबुक, चेकबुक जप्त केली आहेत.