शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

शैक्षणिक साहित्य, गणवेशांचे पैसे उल्हासनगरमध्येही बँक खात्यात

By admin | Updated: April 18, 2017 03:23 IST

महापालिका शाळेतील मुलांना शैक्षणिक साहित्य व गणवेशाऐवजी त्याच अनुदान थेट त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे.

उल्हासनगर : महापालिका शाळेतील मुलांना शैक्षणिक साहित्य व गणवेशाऐवजी त्याच अनुदान थेट त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. यामुळे शैक्षणिक साहित्य खेरदीच्या भ्रष्टाचाराला चाप लागणार आहे. पण पालकांनी ही रक्कम अन्यत्र खर्च केली, तर मुलांची गैरसोय होईल, याकडे पालिका अधिकाऱ्यांनी लक्ष वेधले आहे. या आदेशाची अंमलबजावणी व्हावी, यासाठी ज्या विद्यार्थ्यांकडे आधार कार्ड आणि बँक खाते नाही, त्यांच्यासाठी विशेष मोहीम उघडण्यात येणार असल्याचे उपायुक्त जमीर लेंगरेकर यांनी सांगितले. उल्हासनगर पालिकेत नगररचनाकार विभागानंतर शिक्षण मंडळ चर्चेत व वादात राहिले. शाळेत सहा हजारांपेक्षा कमी विद्यार्थी असताना मुलांची आठ हजार संख्या दाखवून शैक्षणिक साहित्यासह गणवेश व इतर साहित्याची खरेदी होत होती. त्यामुळे तेथील भ्रष्टाचारावर अंकूश ठेवण्यासाठी लेंगरेकर यांनी सरकारी धोरणानुसार शैक्षणिक साहित्यासह गणवेशाची रक्कम मुलांच्या बँक खात्यात जमा करण्याचा निर्णय घेतला. डिसेंबर महिन्यात पालिका शाळेतील मुलांना बँकेत खाते उघडण्यास सांगून त्याचे आधारकार्ड वर्ग शिक्षकांकडे १ मे पूर्वी जमा करण्याचे निर्देश दिले. ज्या मुलांकडे आधारकार्ड व बँकेत खाते नाही. त्यांच्यासाठी विशेष मोहीम उघडून त्यांचे खाते व आधारकार्ड काढणार असल्याचे लेंगरेकर म्हणाले.पालिकेच्या शिक्षण मंडळांतर्गत विविध माध्यमाच्या २८ शाळा येतात. पण पूर्णवेळ अधिकारी नसल्याने शिक्षण मंडळात सावळागोंधळ आहे. शाळेच्या इमारत दुरूस्तीवर कोट्यवधींचा खर्च दाखवूनही शाळा भंगारात निघाल्या आहेत. त्यामुळे हा निधी कुठे खर्च झाला? कोणी लंपास केला? कामावर लक्ष देणारा अभियंता कोण? आदी प्रश्न सतत विचारले जात आहेत. सत्तेत आल्यानंतर भाजपाने शिक्षण मंडळ पालिका मुख्यालयात आणण्याचे संकेत दिले. तसेच मंडळातील गैरकारभाराच्या चौकशीचा इशारा राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिला आहे.शिक्षण मंडळावर अनेक आरोप होऊनही कोणाचीच चौकशी झालेली नाही. तत्कालीन प्रशासकीय अधिकाऱ्यांसह संबंधित कर्मचाऱ्यांवर विनयभंगाचे गुन्हे दाखल झाले. तरीही सत्ताधारी शिवसेना-भाजपाने तेव्हा शिक्षण मंडळ कार्यालय पालिका मुख्यालयात हलविण्याऐवजी तेथेच ठेवण्याचा निर्णय घेतल्याने त्यांनी दोषींना अभय दिल्याची चर्चा रंगली. जादा मुले दाखवून शैक्षणिक साहित्याची खरेदी करणे, त्या साहित्याचे दर अव्वाच्या सव्वा असणे, निविदेत अनियमितता असणे आदी प्रकार यात उघड झाले. ही अनियमितता व भ्रष्टाचारावर अंकूश ठेवण्यासाठीच अनुदानाची रक्कम विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. (प्रतिनिधी)