शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

बांगलादेशी घुसखोर रडारवर, १५ ठिकाणी २०० हून अधिक बांधकाम मजुरांसह फेरीवाल्यांची कोपरी पोलिसांकडून ‘ओळखपरेड’

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2025 08:00 IST

अभिनेता सैफअली खान याच्या घरात घुसून हल्ला करणारा आरोपी बांगलादेशी असल्याचे उघड झाले.  गुन्हेगारी क्षेत्रातही बांगलादेशी नागरिक सक्रिय होत असल्याने त्यांच्या विरोधात कडक कारवाईचे आदेश केंद्र आणि राज्य सरकारने  दिले आहेत.

ठाणे : बांगलादेशी घुसखोरांची मोठी समस्या बनल्यामुळे या घुसखोरांना देशाबाहेर घालविण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. त्यानुसार कोपरी पोलिसांनी गेल्या काही दिवसांपासून आपल्या हद्दीतील हॉटेल, बांधकाम, फेरीवाले आदी ठिकाणी तपासणी मोहीम सुरू केली आहे.  वेगवेगळया १५ ठिकाणी शोध मोहीम राबवून तब्बल २२५ संशयित व्यक्तींची ‘ओळखपरेड’ घेण्यात आल्याची माहिती काेपरी पाेलिसांनी दिली.

अभिनेता सैफअली खान याच्या घरात घुसून हल्ला करणारा आरोपी बांगलादेशी असल्याचे उघड झाले.  गुन्हेगारी क्षेत्रातही बांगलादेशी नागरिक सक्रिय होत असल्याने त्यांच्या विरोधात कडक कारवाईचे आदेश केंद्र आणि राज्य सरकारने  दिले आहेत.

 संशयास्पद परिसरात शोध मोहीम आखण्याची सूचना ठाण्याचे  पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी दिले आहेत. 

कोपरी पोलिसांनी त्यानुसार सुरक्षेसाठी ठाणे पूर्व आणि कोपरी भागातील हॉटेल, बांधकाम, फेरीवाले यांची तपासणी गेल्या काही दिवसांपासून सुरू ठेवल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक निशिकांत विश्वकार यांनी दिली.  

बेकायदा प्रवेश करून बांगलादेशी नागरिक

जिल्ह्याच्या ग्रामीण भागात घुसखोरी करीत आहेत. कोपरीतील बांधकामांच्या साइट्स,  हॉटेल, फेरीवाले, फळभाज्या विक्रेते आदी ठिकाणी भेट देऊन बांगलादेशी नागरिकांची पोलिस तपासणी करीत आहेत.

मुंबई, ठाण्यात सेंट्रिंग करणे, स्लॅब टाकणे, प्लास्टर, लादी अशा छोट्या-मोठ्या कामांसाठी स्वस्तात दुसऱ्या राज्यातील मजूर उपलब्ध होतो. त्यामुळे मोठ्या संख्येने महाराष्ट्राबाहेरील नागरिक रोजगारासाठी आल्याचे आढळले. मात्र,  याच गोष्टीचा फायदा बांगलादेशी घुसखोर घेतात. काही ठिकाणी बांगलादेशी नागरिकही आढळून आले आहेत. त्यामुळे आयुक्त डुंबरे यांच्या आदेशाने काेपरी पाेलिस ठाण्याच्या हद्दीतील संशयास्पद जागांच्या ठिकाणी बांगलादेशी घुसखोरांची शोध मोहीम सुरू ठेवली आहे.

निशिकांत विश्वकार, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, कोपरी पोलिस ठाणे

आतापर्यंत १५ आस्थापनांसह वेगवेगळया  ठिकाणी २२५ नागरिकांची कागदपत्रे तपासली आहेत. बांगलादेशी घुखोराबाबत कोणाकडे माहिती असल्यास, काेपरी पाेलिस ठाण्याच्या हद्दीतील संशयास्पद जागांच्या ठिकाणी कुणी आढळल्यास   नागरिकांनी पोलिसांशी संपर्क साधावा, त्यांचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल, आवाहनही काेपरी पोलिसांनी केले आहे.

टॅग्स :thaneठाणेBangladeshबांगलादेश