शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती तुटली! पुण्यात भाजपा-NCP वेगळे लढणार; अजित पवार म्हणाले, "मी माझं सर्वस्व..."
2
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
3
Plane Crash Mexico Video: इमर्जन्सी लँडिंगआधीच विमान कोसळले; भयंकर अपघातात १० जण ठार
4
TV खरेदीचा विचार करत असाल तर आत्ताच करा, जानेवारीपासून किंमत वाढवण्याची तयारी; कारण काय?
5
आचारसंहिता लागण्यापूर्वी सत्ताधाऱ्यांची धावपळ; प्रकल्पाची उद्घाटने, भूमिपूजन अन् घोषणांचा सपाटा
6
कोट-पँट घालून फिरलात तर अटक अटळ! शिक्षा लेखी नाही, पण चाबकाचे फटकारे अन्...
7
आजचे राशीभविष्य, १६ डिसेंबर २०२५: सरकारी कामात यश, अचानक धनलाभ; सुखाचा दिवस
8
पाकिस्तानमध्ये शिजला पहलगाम हल्ल्याचा कट, सहा जणांविरोधात १,५९७ पानांचे आरोपपत्र!
9
क्रिकेटवेड्या देशाने मेस्सीवर जीव टाकला... पुढे? भारतीय फुटबॉलच्या विकासासाठी काय?
10
इंडिगो गोंधळाबाबतच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागण्याचे आदेश
11
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
12
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
13
संपादकीय : यत्र, तत्र, पाकिस्तान सर्वत्र! ऑस्ट्रेलियातील हल्ल्याचे पाकिस्तानी कनेक्शन
14
शत्रूला दिसणारच नाही भारताचे लढाऊ विमान, जळगावच्या बहिणाबाई विद्यापीठाचे संशोधन
15
...जेव्हा गुंडच पोलिसांच्या कॉलरला हात घालतात; कांदिवलीत ५ अटकेत
16
सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला-उत्तर कमी, गुंता अधिक! न्यायालयीन सल्ल्यामुळे राजकीय अनिश्चितता वाढली
17
आचारसंहितेच्या आधीच निधीचे जीआर, उद्घाटने अन् भूमिपूजनाचा सपाटा; आयोगाची करडी नजर
18
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
19
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
20
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
Daily Top 2Weekly Top 5

धारावी मंदिर ट्रस्टचा बळी देण्यास विरोध, बालयोगी सदानंद महाराजांची सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2018 06:44 IST

भार्इंदरच्या तारोडी येथील प्रसिध्द धारावी मंदिरात श्रध्देच्या नावाखाली चालणारी बळी देण्याची प्रथा व मद्यपान बंद करण्याची सूचना बालयोगी सदानंद महाराज यांनी केली होती. त्यावर तात्काळ निर्णय घेत धारावी मंदिर ट्रस्ट ने बळी देण्यास व मद्यपानास बंदी आणली आहे.

- धीरज परबमीरा रोड - भार्इंदरच्या तारोडी येथील प्रसिध्द धारावी मंदिरात श्रध्देच्या नावाखाली चालणारी बळी देण्याची प्रथा व मद्यपान बंद करण्याची सूचना बालयोगी सदानंद महाराज यांनी केली होती. त्यावर तात्काळ निर्णय घेत धारावी मंदिर ट्रस्ट ने बळी देण्यास व मद्यपानास बंदी आणली आहे. ७ फेब्रुवारी रोजी मंदिराच्या कलशरोहण सोहळ्यासाठी सदानंद महाराज येणार ही बंदी पुढेही कायम राहील, असे ट्रस्टने स्पष्ट केले आहे.तारोडी येथील प्राचीन धारावी देवीचे मुख्यत्वे आगरी आणि कोळी समाज भक्त आहेत. त्याच बरोबर अन्य समाजातील भाविकही देवीच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने येत असतात. मात्र, देवीला नवस म्हणून कोंबडा वा बोकड बळी देण्याची प्रथा गेली अनेक वर्षे सुरू आहे. बळी देण्याच्या या प्रथेसोबत येथे सर्रास बेकायदा मद्यपान केले जाते. विशेष म्हणजे बळी दिलेल्या बोकडांची संख्या वा खाण्या - पिण्यासाठी जमलेल्यांची संख्या या वरुनही अनेकांची चढाओढ लागते. धारावी देवीचे दर्शन घ्यायला येणाºयांऐवजी दारू आणि मटण खाण्यासाठी गर्दी करणाºयांचीच संख्या येथे जास्त दिसते. विशेष म्हणजे पोलीस अधिकारीच नवस करून ते फेडण्यासाठी बोकड बळी देऊन दारु - मटणाचे बेत रंगतात.मंदिराचा कळस हा सिमेंटचा असल्याने धारावी देवी मंदिर ट्रस्टने तांब्यावर सोन्याचा मुलामा दिलेला कळस बसवण्याचा निर्णय घेतला. त्या अनुषंगाने कळस तयार करण्यात आला. हा कळस बालयोगी सदानंद महाराज यांच्या हस्ते बसवला जाणार आहे. बुधवार ७ फेब्रुवारी रोजी सकाळी हा कलशारोहण सोहळा मोठ्या भक्तीभावाने साजरा करण्याची जय्यत तयारी ट्रस्टने चालवली आहे. काशिमीरा नाका येथुन धारावी मंदिर पर्यंत बालयोगींची भव्य मिरवणुक काढली जाणार आहे. विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत.हे कलशारोहण बालयोगींच्या हस्ते व्हावे म्हणुन त्यांना विनंती करण्यासाठी मंदिराच्या ट्रस्टींसह काही मान्यवर गेले होते. त्यावेळी बालयोगींनीच सर्वत्र बळी देण्याची प्रथा बंद झाल्याचे सांगत तुम्ही देखील धारावी मंदिरातील बळीची प्रथा बंद करण्याचा विचार करा असे म्हटले. मी देखील अशा बळी दिल्या जाणाºया ठिकाणी जात नाही, असे बालयोगींनी सर्वांना स्पष्ट केल्याने ट्रस्टींनी देखील बालयोगींचा हा आदेश मानत त्याची अंमलबजावणी सुरु केली आहे.ट्रस्टचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रवीण पाटील, उपाध्यक्ष नरेंद्र पाटील, सचिव रमेश पाटील, खजिनदार विद्याधर रेवणकर, सहसचिव अशोक पाटील यांसह सदस्यांनी बालयोगी सदानंद महाराजांच्या निर्देशानुसार घेतलेल्या या चांगल्या निर्णयाचे विविध स्तरातून स्वागत होत आहे. विशेष म्हणजे ट्रस्टच्या सर्व पदाधिकाºयांनी देखील आधीच पुढाकार घेत धारावी मंदिरात बळी देण्याची प्रथा बंद केली. तसे फलक देखील ट्रस्टने लावले होते. पण त्याचे पालन केले गेले नाही.बेकायदा दारु वर कारवाईची पोलीसांची मोहिम सुरु आहे. धारावी मंदिर ट्रस्टने अशा प्रकारचा निर्णय घेतला असल्यास त्यांचे अभिनंदन करतो. पोलीस प्रशासन त्यांच्या सोबत आहे. बेकायदेशीर मद्यपान होत असेल तर स्थानिक पोलीसांना कारवाई करण्याचे निर्देश दिले जातील.- प्रशांत कदम, अप्पर पोलीस अधिक्षक, ठाणे ग्रामीणबंदीची पोस्टर्स लावूनही उपयोग नाहीमंदिर परिसरात खुलेआम चालणाºया मद्यपानामुळे अनेकदा वाद निर्माण होऊन मारहाणीच्या घटनांनी कायदा तसेच सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे. अगदी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. नवल बजाज हे ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक असताना त्यांनी मंदिराच्या आवारात चालणारे हे मद्यपान बंद केले होते. पण नंतर ते पुन्हा सुरु झालेच. शिवाय लोकप्रतिनिधी, पोलीस - पालिका अधिकारी ही मंडळीच बळी आणि मद्यपान ठेवत असल्याने या सर्व गोष्टींना अभयच मिळाले. दुसरीकडे बेकायदा मद्यपानास ट्रस्टींनी विरोध केला तर श्रध्देच्या नावाखाली ओरड केली जाते.धारावी मंदिरातील बळी प्रथा व मद्यपान बंदीसाठी बालयोगी सदानंद महाराज यांनी घेतलेला पुढाकार समाजहिताचा आहे. ट्रस्टींनी घेतलेल्या निर्णयाचे सर्वांनी अभिनंदन करुन पाठींबा दिला पाहिजे.- गजानन भोईर, प्रदेश सरचीटणीस, आगरी सेनाबालयोगी सदानंद बाबांच्या इच्छे नुसार आम्ही देवीला बळी देण्याचे तसेच परिसरात मद्यपान करण्यास मनाई केली आहे. पण या साठी समाजासह पोलीसांचा देखील पाठींबा आवश्यक आहे.- रमेश पाटील, सचिव, धारावी मंदिर ट्रस्ट

टॅग्स :thaneठाणे