शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

बाल्कनी कोसळून वृद्धा झाली जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2018 02:16 IST

पश्चिमेकडील राव तलावाशेजारी असलेल्या मेंडिस हाउस या सुमारे ३५ वर्षे जुन्या असलेल्या तीन मजली इमारतीची बाल्कनी कोसळून एक वृद्धा गंभीर जखमी झाली.

भार्इंदर : पश्चिमेकडील राव तलावाशेजारी असलेल्या मेंडिस हाउस या सुमारे ३५ वर्षे जुन्या असलेल्या तीन मजली इमारतीची बाल्कनी कोसळून एक वृद्धा गंभीर जखमी झाली. ही घटना शुक्रवारी सकाळी १० वाजता घडली.ही इमारत धोकादायक ठरल्यामुळे तिची अलीकडेच दुरुस्ती करण्यात आली होती. त्यामुळे त्यातील सहा सदनिकांमध्ये रहिवासी राहत होते. तर, तळ मजल्यावर तीन दुकाने सुरू होती. सकाळी मेरी जोसेफ (७०) या दुसऱ्या मजल्यावरील बाल्कनीमध्ये कपडे वाळत घालण्यासाठी उभ्या असताना अचानक बाल्कनीचा भाग कोसळला. त्यामुळे तोल जाऊन मेरी या खाली कोसळल्या. त्यात त्या जखमी झाल्या.घटनेचे वृत्त समजताच परिसरातील नागरिकांनी मेरी यांना जोशी रुग्णालयात दाखल केले. डोक्याला जबर मार लागल्याने त्यांच्यावर शस्त्रक्रिया केली.उजव्या पायाच्या बोटांवर उपचार केले असून डाव्या बाजूच्या खांद्याकडील हाड मोडल्यामुळे त्यांची प्रकृती चिंताजनक बनली आहे. त्यामुळे त्यांना शताब्दी रुग्णालयात दाखल केले आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने इमारतीतील रहिवाशांना सुरक्षित बाहेर काढून इमारत रिकामी केली.तसेच पालिका अधिकारी घटनास्थळी गेले. ही इमारत तोडण्याबाबत त्यांनी आदेश दिले.>नगरसेवक नॉट रिचेबलप्रभाग-७ मध्ये ही दुर्घटना घडली. येथील नगरसेवक अ‍ॅड. रवी व्यास, मोरस रॉड्रिक्स, दीपाली मोकाशी, रक्षा भोपतानी हे नॉट रिचेबल होते. मात्र, नगरसेविका भोपतानी यांचे पती सतीश यांनी घटनास्थळी धाव घेत माहिती घेण्याचा प्रयत्न केला.तर, माजी नगरसेवक स्टीवन मेंडोन्सा यांनी घटनास्थळी उपस्थित राहून अपघातग्रस्त इमारतीतील रहिवाशांना तात्पुरता निवारा देण्याची मागणी बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता दीपक खांबित यांच्याकडे केली आहे.