शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

सर्जनमुळे ढासळले मनोरुग्णालयाचे संतुलन

By admin | Updated: April 20, 2017 04:13 IST

मनोरुग्णांच्या भावभावना समजून घेण्याकरिता मनोरुग्णालयाच्या अधीक्षकपदी मनोविकारतज्ज्ञ असावा

प्रज्ञा म्हात्रे, ठाणेमनोरुग्णांच्या भावभावना समजून घेण्याकरिता मनोरुग्णालयाच्या अधीक्षकपदी मनोविकारतज्ज्ञ असावा, हा महत्त्वाचा निकष पायदळी तुडवत जनरल सर्जन असलेल्या डॉ. दिनकर रावखंडे यांची ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आल्याने सध्या मनोरुग्णालयात सावळागोंधळ आहे. पुण्यापाठोपाठ ठाण्यातील प्रादेशिक मनोरुग्णालय सर्वात मोठे आहे. अलिबाग, मुंबई, ठाणे, नाशिक, धुळे, पालघर, रायगड, नंदुरबार हे आठ जिल्हे या रुग्णालयाशी जोडले गेले आहेत. या भागातील मनोरुग्ण या ठिकाणी दाखल केले जातात. सध्याच्या या रुग्णालयात दीड हजाराहून अधिक रुग्ण उपचारासाठी दाखल आहेत. गेल्या सात वर्षांपासून ठाण्यातील अधीक्षकांचे पद रिक्त होते. या कालावधीत या पदावर प्रभारी नियुक्त केले जात होते. अधीक्षकपदावर मनोविकारतज्ज्ञ असावा, असा नियम असतानाही तो डावलून जनरल सर्जन असणाऱ्या डॉ. रावखंडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ. रावखंडे यांनी यापूर्वी पुण्यात सहायक संचालक वैद्यकीय हे पद भूषवले होते. त्याआधी साडेतीन वर्षे ते सोलापूरमध्ये जिल्हा शल्यचिकित्सक म्हणून कार्यरत होते. मनोविकारतज्ज्ञास मनोरुग्णांच्या मानसिक आजारांची, त्यांच्या औषधोपचारांची माहिती असते. मनोरुग्णांना हाताळणे, हे वैद्यकीय क्षेत्रातील स्पेशलायझेशन आहे. इस्पितळात उपचाराकरिता आणलेल्या मनोरुग्णांपैकी कोणाला दाखल करून घ्यायचे, कोणाला नाही, याचे अनुमान तेच काढू शकतात. मनोविकारतज्ज्ञ आणि मनोरुग्णांत संवाद आवश्यक असतो. रुग्णाच्या मनात सुरू असलेली खळबळ जनरल सर्जनला कशी समजू शकणार? त्यामुळे ते हे पद कसे भूषवू शकतील, हा प्रश्न आहे. इतके सारे प्रश्न अनुत्तरीत असतानाही सध्या मनोरुग्णाला इस्पितळात दाखल करण्याची जबाबदारी डॉ. रावखंडे हेच पार पाडतात, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली. समजा, एखाद्या रुग्णाबाबत डॉ. रावखंडे यांचे निदान चुकले, तर मनोरुग्ण नसलेली व्यक्ती दीर्घकाळ रुग्णालयात खितपत पडण्याचा धोका आहे.