शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

आंबिवलीनजीक बहरतेय वनराई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2020 00:28 IST

१५ हजार झाडांची केली लागवड : मोरांसह विविध पक्ष्यांचा वाढला वावर

अनिकेत घमंडी।लोकमत न्यूज नेटवर्कडोंबिवली : केडीएमसीने आंबिवली येथे वनविभागाच्या ३८ एकर जागेवर मागील वर्षी भारतीय मूळ असलेली १५ हजार झाडे लावली आहेत. सध्या ही वृक्ष चांगलीच बहरली असून, तेथे मोर व अन्य पक्षी येऊ लागले आहेत. त्याचबरोबर तेथे राबवलेला सोलर पॅनलद्वारे ठिबक सिंचनाचा प्रयोगही यशस्वी झाला आहे, अशी माहिती महापालिकेचे सचिव आणि वृक्ष प्राधिकरण समितीचे मुख्य अधिकारी संजय जाधव यांनी दिली.

यासंदर्भात जाधव म्हणाले, भारतीय मूळ असलेली वड, पिंपळ, कदंब, बकुळ, कडुनिंब, चिंच, आंबे, करंज, कांचन, बुछ, शिसम, कैलासपती आशा नानाविध जातींच्या झाडांची लागवड तेथे केली आहे. या झाडांना लागणारे पाणी सूर्यकिरणांद्वारे म्हणजे सोलर ठिबक सिंचनाच्या माध्यमातून दिले जात आहे. त्यामुळे सर्वच्या सर्व झाडे जगली आहेत. सोलर पॅनल चांगल्या पद्धतीने कार्यरत असून त्याची देखभाल फारशी करावी लागत नाही. सोलरवर नियंत्रित असलेले हे एकमेव अभयारण्य असून ते बघण्यासाठी विविध ठिकाणांहून वृक्षप्रेमी येत आहेत. या अभयारण्यात विविध पक्षी येत आहेत. अनेकदा मोर दिसत असल्याने पक्षितज्ज्ञांनी समाधान व्यक्त केले आहे. पुढील वर्षी ही वनराई चांगली बहरल्यानंतर सामान्य नागरिकांसाठी ती कशी खुली करता येईल, याचे नियोजन सुरू आहे. या अभयारण्याच्या सुरक्षेसाठी दोन सुरक्षारक्षक नेमले आहेत.

दरम्यान, अशाच पद्धतीने महापालिकेने उंबर्डे भागात मानवनिर्मित जंगल उभारण्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड केली होती. तेथेही दाट झाडी तयार झाली असून तेथे शिरता येणार नाही, एवढे जंगल आकार घेत असल्याचे जाधव म्हणाले.यंदा कोरोना व निसर्ग वादळामुळे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त कोणताही विशेष कार्यक्रम होणार नाही. मात्र, वादळामुळे महापालिका क्षेत्रात बुधवार, गुरुवारी उन्मळून पडलेल्या झाडांच्या संख्येच्या बदल्यात नवीन असंख्य झाडे लावली जातील, असे जाधव म्हणाले.