शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

इच्छाशक्तीच्या जोरावर बद्रीनाथ, केदारनाथची वारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2018 01:31 IST

जीवनात सकारात्मक जीवनशैली अवलंबिल्यास कोणत्याही पर्यटनासाठी वयाची मर्यादा येत नाही. हे डोंबिवलीतील ८३ वर्षांच्या निर्मला पाध्ये यांनी सिद्ध करून दाखवले आहे

जान्हवी मोर्येडोंबिवली : जीवनात सकारात्मक जीवनशैली अवलंबिल्यास कोणत्याही पर्यटनासाठी वयाची मर्यादा येत नाही. हे डोंबिवलीतील ८३ वर्षांच्या निर्मला पाध्ये यांनी सिद्ध करून दाखवले आहे. बद्रीनाथ व केदारनाथची वारी त्यांनी नुकतीच केली आहे. अवघे चार डिग्री संश सेल्सियस तापमान, कमी असलेला प्राणवायू यावरही त्यांनी मात करत इच्छाशक्तीच्या बळावर ही वारी पूर्ण केली.निर्मला यांनी २९ मार्च ते ८ एप्रिलदरम्यान ही वारी केली. काही प्रवास त्यांनी रेल्वेने तर उर्वरित बसने केला. बद्रीनाथ येथे बद्रीक आश्रम मंडल हे शेवटचे टोक तसेच केदारनाथपासून ११४ किलोमीटरवर दत्तांची आई अनुसया हिचे प्राचीन मंदिर आहे. या दोन्ही ठिकाणी निर्मला गेल्या होत्या. अनुसाय यांचे मंदिर समुद्र सपाटीपासून १४ हजार फूट इतके उंचावर आहे. चार डिग्री संश सेल्सियस तापमान व प्राणवायू कमी असल्याने त्यांना श्वास घेण्यास काही वेळा त्रास झाला.बद्रीनाथ व केदारनाथला जाण्यापूर्वी निर्मला यांनी हरिद्वार, ऋषिकेश, गंगेची पूजा, आरती केली. देव प्रयाग, रूद्र प्रयाग, पंच प्रयाग केले. गोपेश्वर मंडल येथेही त्यांनी दर्शन घेतले. तेथे असलेले शिराळी गाव बशीच्या आकाराचे आहे. तसेच पंच केदार येथे उत्तराखंड सरकारने वन औषधीचे केंद्र उभारले आहे. तेथील औषधांचा त्यांनी लाभ घेतला. त्यामुळे त्यांना प्रवासाची दगदग अथवा ताण, थकवा जाणवला नाही. निर्मला यांच्यासोबत त्यांचे चिरंजीव उदयकुमार हे देखील होते.निर्मला यांना धार्मिक व अध्यात्मिक आवड आहे. त्यामुळे त्या संबंधातील वाचनही त्या करतात. जीवनाकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टीकोन आणि जगण्याची इच्छा शक्ती या जोरावर त्यानी बद्रीनाथ व केदारनाथचा प्रवास केला आहे. सामान्य माणूस तारुण्यात हा प्रवास करू शकत नाही. मात्र निर्मला यांनी इच्छाशक्तीच्या जोरावर जराही न डगमगता हा प्रवास केला. या प्रवासात अन्य १२ जण त्यांच्या सोबतीला होता. त्यापैकी १० जणांना त्रास होऊ लागल्याने त्यांची यात्रा पूर्णच झाली नाही. निर्मला अन्य दोन जणांच्या वयापेक्षा जास्त वयाच्या होत्या. ८३ वय असूनही त्यांनी यात्रा पूर्ण करण्याचा संकल्प करून तो सिद्धीस नेला. यापूर्वी त्यांनी रामेश्वर, तिरुपती आणि नवग्रह यात्रा केली आहे. जुलैमध्ये मदुराई व कन्याकुमारी येथे पर्यटनाला जाण्याचे नियोजन त्यांनी केले आहे.