शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

ऐन गणेशोत्सवात भिवंडीमध्ये दुर्गंधीचे साम्राज्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2018 03:42 IST

भाविकांमध्ये पालिकेविरोधात संतापाचे वातावरण

भिवंडी : मागील काही वर्षापासून ऐन उत्सवाच्यावेळी कचरा उचलणारा कंत्राटदार नागरिकांना वेठीस धरत असून त्यांनी ऐन गणेशोत्सवाच्या काळात कचरा उचलणे बंद केले आहे. काही महिन्यांपासून औषध फवारणीही बंद केली आहे. त्यामुळे शहरात दुर्गंधी साम्राज्य पसरले आहे. ही दुर्गंधी दूर करण्यासाठी नगरसेवकांनी पुढाकार न घेतल्याने गणेशभक्तांना व जैन बांधवांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे.प्रभाग समिती क्र. ५ अंतर्गत येणाºया जुन्या भिवंडीत घरोघरी गणेशमूर्तींची स्थापना केली असून या परिसरात सार्वजनिक गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात. त्याचप्रमाणे या प्रभागात अधिकाधिक जैन समाजाची मंदिरे असून या बांधवांनाही गेल्या काही दिवसांपासून दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. प्रभाग समिती क्र. ५ मध्ये एकूण १७ प्रभाग येतात. त्यापैकी प्रभाग समिती क्र. ६ या प्रभागात महापौर जावेद दळवी व पालिकेच्या स्वच्छता समितीच्या उपसभापती सायली गजानन शेटे निवडून आल्या आहेत. तर महापौर दळवी हे स्वच्छतादूत आहेत. या प्रभागात असलेल्या कचराकुंडीत जंतुनाशक औषधांची फवारणी केलेली नाही. तसेच जंतुनाशक पावडरही न टाकल्याने गणेशभक्तांना दुर्गंधीतून गणेशमूर्ती घरी घेऊन जाव्या लागल्या.प्रभाग समिंती पाचमध्ये सुमारे २२ घंटागाड्या सुरू असून त्यांना घरोघरी, इमारतीखाली व चौकात घंटा वाजवून कचरा गोळा करण्याचे निर्देश असताना ते हॉटेलातील कचरा गोळा करताना तेथेच घंटा वाजवून नागरिकांना तेथे कचरा आणून टाकण्यास सांगतात. तसेच महापालिकेच्या सुटीच्या दिवशी घंटागाड्या व कंत्राटदार कचरा गोळा करत नाहीत अशी तक्रार नागरिकांनी पालिकेकडे केली आहे. पण त्याची दखल घेतली जात नाही.कंत्राटदाराचे बिल पालिकेकडे थकलेले आहे. त्यामुळे त्यांनी कचरा उचलणे बंद केले आहे. तर पालिकेच्या भांडारगृहात जंतुनाशके औषधे असून आरोग्य निरीक्षकांना वारंवार सांगूनही त्यांनी शहरात औषध फवारणी केली नाही, त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे.- हेमंत गुळवी, आरोग्य अधिकारीजैन समाजाचा पर्युषण पर्वाचे उपवास सुरू असून त्यासाठी जैन बांधव मंदिरात येतात. असे असताना रस्त्यावरील घाण व दुर्गंधीचा सामना जैन बांधवांना करावा लागतो. तर औषध फवारणी केली नसल्याने गणेशभक्तांनाही आपल्या गणेशमूर्ती घरोघरी नेताना दुर्गंधीचा सामना करावा लागला. या प्रकरणी आरोग्य अधिकाºयांवर कारवाई करावी, अशी तक्रार पालिका आयुक्तांकडे केली आहे.- अशोक जैन, अध्यक्ष, परिवर्तन मंच

टॅग्स :bhiwandiभिवंडी