शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
4
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
5
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
6
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
7
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
8
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
9
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
10
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
11
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
12
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
13
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
14
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
15
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
16
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
17
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
18
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
19
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
20
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
Daily Top 2Weekly Top 5

बदलापूर पालिका : मागासवर्गीय कल्याण समिती सभापतीपद सेनेकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2019 00:25 IST

विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तीन वर्षांपूर्वी राज्याप्रमाणे बदलापुरातही शिवसेना भाजपची युती झाली होती. याद्वारे भाजपला उपनगराध्यक्षपद तसेच एक विषय समिती सभापतीपद व एक उपसभापती पद देण्यात आले होते

बदलापूर : कुळगाव बदलापूर नगरपालिकेत वर्षभरापासून भाजपकडे असलेले मागासवर्गीय कल्याण समिती सभापतीपद आता शिवसेनेकडे आले आहे. सोनिया ढमढेरे यांची मागासवर्गीय कल्याण विशेष समितीच्या सभापतीपदी बिनविरोध निवड झाली आहे.मंगळवारी कुळगाव बदलापूर नगरपालिका सभागृहात नगराध्यक्ष प्रियेश जाधव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष सभेत ही निवड करण्यात आली. या सभेत सुरूवातीला भाजपचे किरण बावस्कर, शरद तेली तसेच शिवसेनेच्या सोनिया ढमढेरे, मुक्ता पांडे,प्रतिभा गोरे यांची मागासवर्गीय समिती सदस्यपदी निवड करण्यात आली. या सदस्यांमधून ढमढेरे यांची सभापतीपदी बिनविरोध निवड झाली.

विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तीन वर्षांपूर्वी राज्याप्रमाणे बदलापुरातही शिवसेना भाजपची युती झाली होती. याद्वारे भाजपला उपनगराध्यक्षपद तसेच एक विषय समिती सभापतीपद व एक उपसभापती पद देण्यात आले होते. परंतु नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत मात्र उपनगराध्यक्षपदावरून बिनसल्याने सत्तेतून बाहेर पडलेल्या भाजपने त्यांच्या वाट्याला आलेल्या सभापतीपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर झालेल्या विषय समिती निवडणुकीच्यावेळी मात्र भाजप शिवसेनेची पुन्हा हातमिळवणी झाली.

भाजपला पुन्हा एकदा पाणीपुरवठा समिती सभापतीपद व महिला बालकल्याण उपसभापतीपद मिळाले. त्यानंतर सुमारे वर्षभरापूर्वी भाजपचे हेमंत चतुरे यांची मागासवर्गीय कल्याण समिती सभापतीपदी बिनविरोध निवड झाली होती. त्यामुळे आता हे पद भाजपकडे राहील, असा अंदाज वर्तवला जात होता.