शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

बदलापूरमध्ये पाव तीन रुपयांनी महागला, शनिवारपासून नवे दर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2019 00:35 IST

लादीमागे मोजा १८ रुपये : खारी-टोस्ट पाच रुपयांनी वधारले

लोकमत न्यूज नेटवर्कबदलापूर : गरमागरम वडा, चमचमीत पावभाजी यासोबत अविभाज्य घटक असलेला पाव आता तीन रुपयांनी महागणार आहे. बदलापुरातील बेकरीचालकांनी येत्या ३१ आॅगस्टपासून पावाचे दर वाढवण्याचा निर्णय घेतला असून तूर्त १५ रुपयांना मिळणारी पावाची लादी पुढील महिन्यापासून १८ रुपये करण्यात येणार आहे, अशी माहिती बेकरी ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष मेहमूद अब्दुल्ला गडकरी यांनी स्पष्ट केले.

बदलापुरातील बेकरीमालकांची संघटना असलेल्या कुळगाव-बदलापूर बेकरी ओनर्स वेल्फेअर असोसिएशनची अलीकडेच बैठक पार पडली. यावेळी सर्वानुमते दरवाढीचा निर्णय घेण्यात आला. जीवनावश्यक वस्तूंच्या किमती स्थिर ठेवण्यात शासन अपयशी ठरल्यामुळे महागाई वाढत असल्याचे बेकरी ओनर्स असोसिएशनचे म्हणणे आहे.

दरम्यान पाव, खारी, बटर, टोस्ट अशा बेकरी उत्पादनांसाठी लागणाऱ्या तेल, तूप, साखर, मैदा अशा वस्तूंच्या किमतीमध्ये तसेच भट्टीसाठी लागणाºया लाकडाच्या किमतीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने बेकरी उत्पादनांच्या किमतीत वाढ करण्याचा निर्णय बेकरी ओनर्स असोसिएशनने घेतला आहे.

खारी, बटर व टोस्टच्या किमतीत किलोमागे पाच रुपयांची वाढ करण्यात आली आहे.बदलापुरात एकूण १४ बेकºया असून यामध्ये दिवसाला सहा हजारांहून अधिक लादीपाव तयार केले जातात. तीन वर्षांपूर्वी २०१६ नोव्हेंबरमध्ये पावाचे दर तीन रु पयांनी वाढवण्यात आले होते.आज बेकरीबंद आंदोलनवाढती महागाई रोखण्यात सरकार अपयशी ठरत असल्याच्या निषेधार्थ शुक्र वारी बदलापुरातील सर्व बेकºया बंद ठेवण्यात येणार आहेत.बंदमध्ये सर्व बेकरीचालक सहभागी होणार असून या दिवशी बदलापूरमध्ये कोणालाही पाव आणि बेकरी उत्पादने मिळणार नाहीत.