शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

बालविवाहातून सुटका झालेल्या मुलीची सुधारगृहात छळ, सुटकेसाठी दीड लाख मागितल्याचा आरोप 

By सदानंद नाईक | Updated: March 5, 2025 17:43 IST

Ulhasnagar News: बालविवाह रोखून बाल विकास समितीने मुलीची रवानगी शासकीय मुलीच्या निरीक्षणगृहात केली. निरीक्षणगृहात मुलीचा छळ झाल्याने, तिच्यावर मध्यवर्ती रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

- सदानंद नाईक उल्हासनगर - बालविवाह रोखून बाल विकास समितीने मुलीची रवानगी शासकीय मुलीच्या निरीक्षणगृहात केली. निरीक्षणगृहात मुलीचा छळ झाल्याने, तिच्यावर मध्यवर्ती रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर मुलीच्या सुटकेसाठी बाल कल्याण समितीच्या एका महिला सदस्यांने दी ड लाख रुपये मागितल्याचा आरोप मुलीच्या आई वडिलांनी करून खळबळ उडून दिली.

उल्हासनगर पूर्वेतील एका हॉल मध्ये २४ फेब्रुवारी रोजी होत असलेला बालविवाह रोखण्यात महिला व बालकल्याण विभागाचे अधिकारी व पोलिसांना यश आले. याप्रकरणी हिललाईन पोलिसांनी नवरा मुलगा, त्याचे आई-वडील, मुलीचे आई-वडील व मध्यस्थी अश्या १० जणावर हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. मुलीवर समुउपदेश होण्यासाठी व इतर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होऊ पर्यंत महिला व बाल विकास समितीच्या अध्यक्षा राणी भैसाणे यांनी मुलीची रवानगी शासकीय मुलीच्या निरीक्षणगृहात केली. दरम्यान मुलीच्या आई-वडिलांनी स्टॅम्प पेपरवर मुलीच्या सुरक्षेची हमी (माफीनामा ) देऊन मुलगी ताब्यात देण्याची मागणी केली. निरीक्षणगृहात रवानगी झालेल्या मुलीचे समुपदेशन होण्याऐवजी निरीक्षणगृहातील इतर मुलीकडून तीचा छळ केल्याचे उघड झाले.

निरीक्षणगृहातील मुलीनी तीला भांडे व कपडे धुणे, पाणी भरण्यास सांगणे, साफसफाई करणे आदी कामे करण्यास भाग पाडले. मंगळवारी सकाळी ११ वाजता मुलीची तब्येत बिघडल्याचा फोन निरीक्षणगृहातून आई-वडिलांना आल्यावर त्यांनी धाव घेऊन मुलीला मध्यवर्ती रुग्णालयात उपचारासाठी भरती केले. मुलीने निरीक्षणगृहात छळ झाल्याचे सांगितले. तसेच मुलीच्या आई-वडिलांनी बाल समिती केंद्राच्या झेंडे नावाच्या सदस्यांने मुलीच्या सुटकेसाठी दिड लाख रुपये मागितल्याचा आरोप केला. आम्ही माफीनामा लिहून दिल्यावरही मुलीची सुटका करून आम्हाच्या ताब्यात का दिले नाही. असा प्रश्न केला. 

मुलीला झाली मारहाण शासकीय मुलीचे निरीक्षणगृहात १५ पेक्षा जास्त मुली असून त्यांच्याt भांडणे होतात. या मुलीलाही मारहाण व छळ झाला असावा, असे हाणामारीचे प्रकार सुधारगृहात होतात.  - व्ही व्ही सिल्व्हर-अधिक्षिका- मुलीचे निरीक्षणगृह  

बाल समितीवर राजकीय दबावबालविवाह रोखलेल्या मुलीचे समुउपदेश व्हावे, ती सुरक्षित राहावी म्हणून तीला निरीक्षणगृहात ठेवले. तिच्या सुटकेची प्रक्रिया सुरु होती. मात्र मुलीच्या आई-वडिलांनी बाल समितीवर राजकीय दबाव आणून आम्हची सुरक्षा धोक्यात आली. दिड लाख रुपये मागितल्याचा आरोप खोटा असून त्याबाबत त्यांनी पुरावा सादर करावा. - अध्यक्षा ठाणे महिला व बाल समिती 

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगरthaneठाणे