शहरं
Join us  
Trending Stories
1
गौतम गंभीरने पिचशी छेडछाड थांबवावी अन् मी सांगतोय ते ऐकावं...; सौरव गांगुलीचा थेट सल्ला
2
ओला ईलेक्ट्रीक गटांगळ्या खाऊ लागली? पुण्यातील सर्व्हिस सेंटर तोडले, अख्ख्या मुंबईत तेही ठाण्यात एकच सर्व्हिस सेंटर...
3
Sheikh Hasina Net Worth: शेख हसीना यांच्या नोकराकडेच होते २८४ कोटी; 'मॅडम'कडील प्रॉपर्टीचा आकडा वाचून तर बघा...
4
'या' एका चुकीमुळे लीक होऊ शकते तुमचे व्हॉट्सअ‍ॅपचे प्रायव्हेट चॅट; तुम्हाला माहीत आहे का?
5
'ऑपरेशन सिंदूर' हा फक्त ट्रेलर होता', लष्करप्रमुखांचा पाकिस्तानला उघड इशारा, दिल्ली स्फोटानंतर लष्कर सज्ज
6
मोबाईलवर मिनिटांत तपासा तुमचा NPS बॅलन्स; पाहा NSDL, उमंग ॲप आणि मिस्ड कॉलची सोपी पद्धत
7
फलटणमध्ये महायुतीतच 'खेळ'! शिंदेंच्या शिवसेनेकडून रामराजेंचा मुलगा, भाजपाकडून माजी खासदारांचा भाऊ मैदानात
8
कमाल! नोकरीसोबतच घरची जबाबदारी, ६ वेळा नापास; २ मुलींची आई ४० व्या वर्षी झाली IAS
9
बांगलादेश कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर शेख हसीना यांची पहिली प्रतिक्रिया; काय म्हणाल्या? 
10
Delhi Blast: दिल्लीत स्फोट घडवण्यासाठी किती पैसे दिले गेले होते, डॉ. शाहीनची काय होती भूमिका?
11
बँकिंग शेअर्समध्ये ऐतिहासिक तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये जोरदार वाढ; 'ही' आहेत प्रमुख ४ कारणं
12
किरकोळ गुंतवणूकदारांनी 'या' १० शेअर्समध्ये टाकले ₹१८,००० कोटी! सुजलॉन त्यापैकी एक, आणखी नावं कोणती?
13
DIY Tips: ड्राय क्लीनिंगचा खर्च वाचवा! कपड्यांवरील चिवट डाग काढण्यासाठी 'हा' घरगुती फॉर्म्युला वापरा 
14
"राहुल गांधी पंतप्रधान होवोत अथवा न होवोत, आमचा हेतू...!" बिहार निवडणुकीसंदर्भात बोलताना काय म्हणाले रॉबर्ट वाड्रा? 
15
क्रिप्टो मार्केटमध्ये हाहाकार! बिटकॉइन १५ लाख तर इथर १.३५ लाखानं कोसळला; ही आहेत कारणं
16
दिल्लीतील स्फोटात बुटाचा वापर, उमरने TATP स्फोटकांचा केला वापर; NIA च्या तपासात खळबळजनक माहिती
17
MLA Disqualification Case: 'आमदारांचं प्रकरण दोन आठवड्यात निकाली काढा, नाहीतर...'; सर्वोच्च न्यायालय विधानसभा अध्यक्षांवर संतापले
18
Gold & Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल; Gold २ हजारांपेक्षा अधिकनं झालं स्वस्त, Silver मध्ये ६५०० ची घसरण
19
दिल्ली स्फोट तपास: कोडवर्ड, 'वुल्फ आवर' आणि महिला दहशतवाद्यांचे 'ऑरोरा-लूना' पथक!
Daily Top 2Weekly Top 5

दंडाची रक्कम ज्येष्ठ तक्रारदारास देण्यास टाळाटाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2019 23:54 IST

महावितरणविरोधात चिकाटीने लढा : ओळखपत्र न लावलेल्या अधिकाऱ्यांवरील कारवाईचा वाद

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : वागळे इस्टेट येथील महावितरणच्या कार्यालयातील अधिकाऱ्यांनी त्यांचे ओळखपत्र गळ्यात घातले नव्हते. याशिवाय, त्यांच्या शर्टाला नावाची व पदाची नामपट्टीकादेखील नव्हती. याविरोधात येथील ज्येष्ठ नागरिकांनी महावितरणकडे तक्रार करून दाद मागितली असता संबंधित दोन्ही अधिकाºयांवर प्रत्येकी १०० रुपये दंड भरण्याची कारवाई झाली. एवढेच नव्हे तर, या दंडाची रक्कम तक्रारदारास देण्याचेही महावितरणच्या विधी अधिकाºयांनी आदेशात स्पष्ट नमूद केले. मात्र, अजूनही ही रक्कम महावितरणच्या अधिकाºयांकडून मिळालेली नसल्यामुळे संताप व्यक्त होत आहे.ठाण्याच्या पूर्वेला असलेल्या देविका सोसायटीतील उज्ज्वलराय मोरेश्वर जोशी हे ज्येष्ठ नागरिक कार्यालयीन कामाकरिता ५ एप्रिल २०१९ रोजी महावितरणच्या वागळे इस्टेटच्या अधीक्षक अभियंता कार्यालयात गेले होते. तेथे कार्यकारी अभियंता डी.व्ही. मेहेत्रे व उपकार्यकारी अभियंता ए.पी. खोडे यांच्याशी त्यांनी संपर्क केला. यावेळी या दोन्ही अधिकाºयांनी आपल्या नावाची नामपट्टीका (नेमप्लेट) किंवा ओळखपत्र धारण केलेले नसल्याचे आढळून आले. त्यामुळे याबाबत महाराष्ट्र विद्युत नियामक प्राधिकरणाच्या (एमईआरसी) नियमानुसार या दोन्ही अभियंत्यांवर दंडात्मक कारवाई करण्याबाबत तक्र ार अर्ज त्यांनी सादर केला होता. या अधिकाºयांवरील कारवाईसाठी चार महिने पाठपुरावा करूनही त्यांना समाधानकारक उत्तर देण्यात आले नाही. म्हणून, त्यांनी या तक्र ार अर्जावर केलेल्या कार्यवाहीबद्दल माहिती देण्यात यावी, असा अर्ज माहिती अधिकार कायद्याखाली केला. त्यावर मेहेत्रे व खोडे यांना प्रत्येकी १०० रुपये इतक्या रकमेच्या दंडवसुलीची कारवाई केली आहे.वसूल केलेल्या दंडाची रक्कम आपण केलेल्या अर्जानुसार आपणास अदा करावयाची किंवा कसे, याबाबत या कार्यालयाकडून विधी सल्लागार, कोकण प्रादेशिक कार्यालय कल्याण, यांच्या कार्यालयाकडून मार्गदर्शन मागविण्यात आलेले आहे. ते प्राप्त झाल्यावर कारवाई करण्यात येईल, असे २८ आॅगस्ट २०१९ रोजी जोशी यांना दिलेल्या खुलासापत्रात महावितरणने स्पष्ट केले होते.विधी सल्लागारांचा अभिप्राय अर्जदाराच्या बाजूनेमहावितरणच्या खुलासा पत्राचादेखील जोशी यांनी तब्बल दोन महिने पाठपुरावा केला. शेवटी, त्यांनी सदर खुलासापत्रानुसार विधी सल्लागार, कोकण प्रादेशिक कार्यालय, कल्याण यांच्याकडून प्राप्त मार्गदर्शनपत्राची प्रत माहिती अधिकार अर्जाद्वारे मागितली. ४ डिसेंबर रोजी विधी सल्लागार, कोकण प्रादेशिक कार्यालयाकडून त्यांना १७ सप्टेंबरच्या मार्गदर्शनपत्राची प्रत मिळाली.त्यात निवृत्त जिल्हा व सत्र न्यायाधीश आणि सध्या कल्याण येथील कोकण प्रादेशिक कार्यालयाच्या विधी सल्लागार डॉ. चित्रा के. भेदी यांनी जोशी यांच्या तक्र ार अर्जावर एमईआरसीच्या नियमानुसार तक्र ारदार ग्राहकास कंपनीच्या नियमावलीप्रमाणे ‘सेवा न दिल्याकारणे भरपाईस्वरूपात वसूल केलेल्या दंडाची रक्कम दिली पाहिजे’ असा स्पष्ट अभिप्राय आहे.न्यायालयात दाद मागणारयाप्रकरणातील गंभीर बाब म्हणजे, हे मार्गदर्शनपत्र अधीक्षक कार्यालयास प्राप्त होऊन दोन महिने उलटले आहेत. तरीदेखील दंड वसूल करून जोशी यांना दिलेला नाही. या दंडाची रक्कम देण्यास अक्षम्य टाळाटाळ करण्यात येत असल्यामुळे जोशी यांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे तीव्र संताप व्यक्त करून ते आता महावितरण अधिकाºयांच्या या मनमानीविरोधात पुन्हा न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्याच्या प्रयत्नात आहे. याशिवाय, टाळाटाळ व विलंब कृतीबद्दल दंडात्मक कारवाईकरिता काही नियमावली एमईआरसीने बनवली आहे का, याचा शोधही त्यांच्याकडून घेतला जात आहे.