शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे स्थानकातील नऊ प्रवेशद्वारांना टाळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2019 01:25 IST

ठाणे रेल्वे स्थानकात ये-जा करण्यासाठी एक-दोन नव्हे तर तब्बल तेवीस प्रवेशद्वार आहेत.

ठाणे : ठाणे रेल्वे स्थानकात ये-जा करण्यासाठी एक-दोन नव्हे तर तब्बल तेवीस प्रवेशद्वार आहेत. मात्र,एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रवेशद्वारांची रेल्वे स्थानकाला सद्यस्थितीत गरज नाही. यामुळे सुरक्षितेच्या कारणास्तवास रेल्वे स्थानकातील नऊ प्रवेशद्वार बंद करण्याचा निर्णय घेऊन त्यातील ठाणे पश्चिमेकडील दोन प्रवेशद्वारांना रेल्वेने टाळेही लावले आहे. हे टाळे आपत्तीजन्य परिस्थिती उद्भवल्यावरच तातडीने उघडण्याची व्यवस्था ठेवल्याचे ठाणे आरपीएफ पोलिसांनी सांगितले.ठाणे रेल्वे स्थानकातून नियमित साडेतीन लाख लोकल प्रवासी तिकीटांची विक्री होत असून त्या प्रवासी संख्येसह पासधारक आणि एक्स्प्रेसने प्रवास करणारी अशी सुमारे सात-आठ लाख प्रवासी दररोज ये-जा करतात. तसेच दहा फलाटांचे रेल्वे स्थानक असून आत-बाहेर करण्यासाठी तब्बल २३ प्रवेशद्वारे आहेत. त्यामध्ये पश्चिमेला १० आणि पूर्वेस ६ तसेच स्थानकाला जोडलेल्या उड्डाणपुलांना ७ प्रवेशद्वारांसह एकूण २३ अधिकृतरित्या प्रवेशद्वार आहेत. त्यामधील पश्चिमेकडील पाच आणि पूर्वेतील ४ अशा नऊ प्रवेशद्वारांना टाळे लावण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार प्रवेशद्वार बंद करण्याच्या कामाला सुरुवात केली आहे. यात रेल्वेस्थानकाच्या मुख्य इमारतीचे दोन प्रवेशद्वार बंद केले आहेत. हा निर्णय पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्लयानंतर गर्दीच्या रेल्वे स्थानकांना हाय अ‍ॅलर्टचा इशारा गुप्तचर विभागाने दिल्यानंतर ठाणे रेल्वे प्रशासन आणि ठाणे आरपीएफ पोलिसांनी संयुक्तरित्या सुरक्षितेच्या दृष्टीने पाहणी करून घेतल्याची माहितीसूत्रांनी दिली.>रेल्वे स्थानकात २३ प्रवेशद्वारांपैकी ९ प्रवेशद्वारे बंद करण्याचा निर्णय झाला आहे. त्यातील दोन प्रवेशद्वारांना टाळे लावले आहेत. त्या प्रवेशद्वारांचे टाळे एखाद्यावेळी गर्दी झाल्यावर किंवा आपत्तीजन्य परिस्थिती ओढावल्यास ते तातडीने उघडले जाईल, अशी व्यवस्था केली आहे.- राजेंद्र पांडव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, आरपीएफ, ठाणे.