शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

अबब! जागा २३८ उमेदवार मात्र ४९०३२, ओळख पटण्याकरिता बायोमेट्रिक सिस्टीमचा वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2018 03:31 IST

ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील रिक्त शिपाईपदाच्या २३८ जागांसाठी सुरू असलेल्या पोलीसभरतीसाठी विविध राज्यांतील ४९ हजार ३२ इच्छुकांची शारीरिक व मैदानी चाचणी घेण्यात येत आहे.

ठाणे : ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील रिक्त शिपाईपदाच्या २३८ जागांसाठी सुरू असलेल्या पोलीसभरतीसाठी विविध राज्यांतील ४९ हजार ३२ इच्छुकांची शारीरिक व मैदानी चाचणी घेण्यात येत आहे. तसेच दररोज दोन हजार ५०० इच्छुकांना भरती प्रक्रियेसाठी बोलवण्यात येत असून ४९ हजार ३२ इच्छुकांमध्ये नऊ हजार ५६६ इच्छुक पदवीधर, चार हजार ७७७ इच्छुक हे पदव्युत्तर पदवीधर व इतर आहे. तसेच उर्वरित ३४ हजार ६८९ इच्छुक हे एचएससी झालेल्या उमेदवारांचा समावेश आहे. तसेच भरतीच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले असून उमेदवारांची ओळख पटण्याकरिता बायोमेट्रिक सिस्टीमचा वापर केला आहे. त्याचबरोबर भरतीदरम्यान उन्हाळ्याचा उमेदवारांना त्रास होणार नाही, यासाठी आवश्यक तेवढी काळजी घेतल्याची माहिती ठाणे शहर पोलीस अप्पर पोलीस आयुक्त मकरंद रानडे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.ठाणे शहर पोलीस साकेत मैदानात पोलीसभरती प्रक्रिया पारदर्शक आणि नि:पक्षपातीपणे होण्याच्या दृष्टिकोनातूून सुरुवात झाली आहे. शहरात उन्हाचा पारा चढताना दिसत असल्याने उमेदवारांना उन्हाळ्याचा त्रास होऊ नये, याकरिता पहाटे ५ ते ११ आणि त्यानंतर दुपारी ३.३० ते ६.३० या वेळेत दररोज दोन हजार ५०० उमेदवारांना शारीरिक मोजमाप आणि मैदानी चाचणीसाठी बोलवण्यात येते. मैदानी चाचणीत उमेदवारांना मिळालेले गुणत्यांना तत्काळ वाचून दाखवले जात आहेत. त्यानंतर, त्यांची स्वाक्षरी घेण्यात येते. ज्या उमेदवारांनीआपल्या शारीरिक मोजमापासंदर्भात आक्षेप घेऊन संधीची मागणी केली आहे. त्याला तीन वेळा संधी दिली जात आहे.>आमिषाला बळी पडू नयेभरती प्रक्रियेकरिता पैशांची मागणी कोणी करत असेल, तर सहआयुक्त आणि अप्पर पोलीस आयुक्तांशी तथा ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी थेट संपर्क साधावा, तसेच कोणत्याही आमिषाला बळी पडू नये, असे आवाहन अप्पर पोलीस आयुक्त रानडे यांनी केले आहे. तर, भरती प्रक्रियेतील सर्व पोलीस अधिकारी-कर्मचारी, मंत्रालयीन कर्मचारी तसेच उमेदवारांनादेखील मैदानावर असताना मोबाइलचा अनावश्यक वापर करण्यास बंदी घातली आहे. तसेच भरती बंदोबस्ताकरिता आणि प्रक्रियेतील नेमलेल्या पोलीस अधिकारी आणि मंत्रालयीन कर्मचाऱ्यांसाठी वेगवेगळ्या रंगांची ओळखपत्रे दिली आहेत.अशी घेतली आहे काळजीडमी उमेदवार सहभागी होऊ नये, यासाठी मैदान चारही बाजूने बंदिस्त केले आहे. ओळख पटण्यासाठी बायोमेट्रिक सिस्टीमचा वापर, सीसीटीव्ही कॅ मेरे लावले असून प्रत्येक चाचणीचे व्हिडीओ शूटिंग होत आहे. मैदानावर पुरेशा पाण्याची फवारणी होते. इजा झाल्यास तातडीने प्रथमोपचार साहित्य, वैद्यकीय अधिकारी व त्यांचे पथक तैनात केले आहे. तसेच मैदानावर स्वतंत्र नियंत्रण कक्ष आहे.चाचणीसाठी व्यवस्थामैदानी चाचण्या करताना उमेदवारांना त्रास होऊ नये, यासाठी १०० मीटर धावणे चाचणीसाठी तीन मैदाने, लांबउडी व गोळाफेक चाचणीसाठी चार मैदाने, पुलअप्ससाठी तीन स्टॅण्ड्स, १६०० मीटर धावणे चाचणीसाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूंना झाडांची सावली असणारा रस्ता उपलब्ध करून त्या ठिकाणी घेण्यात येत आहे.

टॅग्स :Policeपोलिस