शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसचे स्वपक्षीय अपक्षांवर लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2017 05:39 IST

मीरा-भार्इंदर शहर (जिल्हा) काँग्रेसने यंदाच्या पालिका निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या टप्प्यात एबी फॉर्म देण्यास विलंब झाल्याने ऐन निवडणुकीत पक्षाच्या तीन उमेदवारांना अपक्ष म्हणून निवडणूक लढवावी लागत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कभार्इंदर : मीरा-भार्इंदर शहर (जिल्हा) काँग्रेसने यंदाच्या पालिका निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या टप्प्यात एबी फॉर्म देण्यास विलंब झाल्याने ऐन निवडणुकीत पक्षाच्या तीन उमेदवारांना अपक्ष म्हणून निवडणूक लढवावी लागत आहे. हे तिन्ही उमेदवार पक्षासाठी महत्त्वाचे मानले जात असल्याने या उमेदवारांच्या विजयाकडे लक्ष लागलेले आहे.काँग्रेसने यंदाच्या पालिका निवडणुकीत ७६ उमेदवार उभे केल्याचा दावा केला असला तरी त्याहून अधिक उमेदवार रिंगणात उतरले आहेत. त्यात पक्षाकडून एबी फॉर्म विलंबाने मिळाल्यामुळे अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहे. त्यात प्रभाग १९ मध्ये राजीव मेहरा, प्रभाग ९ मध्ये अमजद गफ्फूर शेख, प्रभाग २० मध्ये रूपा पिंटो यांचा समावेश आहे. यातील प्रभाग ९ व १९ मधील उमेदवार राष्टÑवादीतून काँग्रेसमध्ये आले आहेत. असाच प्रकार आणखी उमेदवारांच्या बाबतील घडल्याने त्यांनी मात्र अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्यास नापसंती दर्शवली.काँग्रेसचा प्रचार भाजपाविरोधी नाही, तर भाजपाच्या स्थानिक नेतृत्वाच्या विरोधात असल्याचे सांगितले जात आहे. दुसºया बाजूला काँग्रेस किंगमेकरची भूमिका बजावण्याचे भाष्य करून सेनेसोबत जाणार असल्याचे संकेत देत आहे. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची १६ आॅगस्टला मीरा रोडमधील शांतीनगर सेक्टर २ व ३ येथे सभा होणार आहेत. तत्पूर्वी १३ आॅगस्टला मुंबई प्रदेशाध्यक्ष संजय निरूपम यांच्या सभा होणार आहेत. त्यात भार्इंदर पूर्वेकडील प्रभाग ३, पश्चिमेकडील प्रभाग १, मीरा रोड येथील कनाकिया परिसरातील प्रभाग १२ व हाटकेशमधील प्रभाग १३ मध्ये सभा होतील. याखेरीज, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी उद्योगमंत्री नारायण राणे, गुरुदास कामत यांनाही प्रचारासाठी निमंत्रित करणार असल्याचे समजते.