शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

प्रदूषणकारी ८९ कंपन्यांची नावे दडवण्याचा प्रयत्न?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2019 00:17 IST

राजू नलावडे यांची टीका : माहितीच्या अधिकारात दिला तपशील

डोंबिवली : गेल्या काही दिवसांत प्रदूषणाच्या तक्रारींत वाढ झाल्याने नेमक्या किती व कोणत्या प्रदूषण करणाऱ्या कंपन्यांविरोधात प्रदूषण नियंत्रण मंडळाने कारवाई केली आहे, याची आकडेवारी माहिती अधिकारात माहिती अधिकार चळवळीतील कार्यकर्ते राजू नलावडे यांनी विचारली होती. मात्र, ही माहिती देण्यास मंडळ टाळाटाळ करीत असल्याचा व ती त्रोटक देत असल्याची टीका नलावडे यांनी केली.

१ एप्रिल २०१६ पासून प्रदूषण करणाºया किती कंपन्या बंद करण्यात आल्या व त्यांची नावे द्या, असा तपशील नलावडे यांनी १३ नोव्हेंबरला माहिती अधिकारात विचारला होता. त्यानुसार, महिन्यानंतर मंडळाने दिलेल्या उत्तरात एप्रिल २०१६ पासून आतापर्यंत प्रदूषण करणारे ८९ कारखाने बंद करण्याच्या नोटिसा दिल्या असल्याची माहिती दिली आहे. मात्र, त्या कंपन्यांची नावे मागूनही ती दिली नसल्याचा आरोप नलावडे यांनी केला. त्यामुळे खरेच त्या बंद केल्या की नाही, हे समजत नसून शोध तरी कसा घ्यायचा, असा सवाल त्यांनी केला.डोंबिवलीतील अतिप्रदूषित, प्रदूषण करणाºया कंपन्या कोणत्या आहेत, यावर अशी माहिती जतन केली जात नाही, असेही उत्तर देण्यात आल्याचे ते म्हणाले.

देशातील प्रदूषित शहरांच्या यादीत महाराष्ट्रातील सहा शहरे असून त्यात डोंबिवलीचा समावेश आहे. डोंबिवलीचा सर्वसमावेशक पर्यावरण प्रदूषण दर्शक ६९.६७ एवढा आहे. साधारण तसे दर्शक प्रमाण ६० वरील असल्यास ते शहर चिंताजनक पातळीवर असल्याचे प्रमाण मानले जाते. डोंबिवलीतील हवा आणि पाणी याचेही प्रदूषण प्रमाण अनुक्रमे ६२ व ६३.५ इतके आहे. डोंबिवलीचा हवेचा गुणवत्ता निर्देशांक हे प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असल्याची माहिती देण्यात आली आहे.

डोंबिवलीतील प्रदूषण वाढण्याला औद्योगिक कारखाने, शहरातील बांधकामे, वाहतूककोंडी, अस्वच्छता इत्यादी अनेक कारणे असू शकतात, असेही नलावडे यांनी सांगितले. दरम्यान, मंडळाने नोटीस बजावलेल्या कंपन्यांची नावे न दिल्याने एमआयडीसीतील कंपन्यांवरील कारवाईमध्ये पारदर्शक कारभार होत नसल्याची टीका त्यांनी केली.

माझ्या माहितीनुसार मुळात माहिती अधिकारात प्रश्नार्थक माहिती मागू नये. पण असे असतानाही राजू नलावडे यांनी जे प्रश्न विचारले, त्यानुसार प्रदूषण करणाºया किती कंपन्यांवर कारवाई केली, तो आकडा देण्यात आला आहे, त्यांनी मागितलेली सर्व माहिती मंडळाने दिली आहे.- संजय भोसले, उपप्रादेशिक प्रदूषण नियंत्रण मंडळ अधिकारी